Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

Redefining Education

 Field Diary:1 There are many true COVID-19 Worriers.Nilesh,You are the inspiration for all.Your tremendous efforts for continuing education will bring change in education very soon. #Education_Shouldnt_stop! Atul Sangita Atmaram-9527544478

घनकचरा व्यवस्थापनाचा सुप्त किडा

 टाटा इन्स्टिट्यूट मधून पाणी,स्वछता आणि आरोग्य व्यवस्थापन विषयात पदवी घेऊन  मी युनिसेफ संस्थेसाठी काम करत आहे.जेव्हापासून मी WASH कोर्सला प्रवेश घेतलंय, तेव्हापासून जिथं कुठं  मला घनकचरा दिसतोय-तेव्हा माझ्यातील सुप्त किडा मला नेहमीच आव्हान करत होता. "अरे अतुल,एवढा तुझ्यासमोर कचरा दिसतोय आणि तू काहीच करत नाहीयेस ?" असं बोलल्याप्रमाणे तो मला जणू शह देत होता. माझ्यासह अखिल मानवजात त्यांच्या दैनंदिन जीवनात कोट्यवधी किलोचा कचरा निर्माण करून पृथ्वीवर साठवत आहे.आणि फार कमी लोक त्याच्या व्यवस्थापणासाठी काम करत आहेत.  मी यवतमाळ येथील उमरी गावातील एका संस्थेत मागच्या एक आठवड्यापासून मुक्कामी आहे.येण्याचं प्रयोजन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. अभियांत्रिकी आणि सामाजिक विज्ञान शास्त्रातील माझ्या पदवीचा उपयोग या ठिकाणी पुरेपूर करून शिक्षण,पोषण आणि पर्यावरण विषयात दखलपात्र काम करता येऊ शकतं का ? याचाच मला अनुभव घ्यायचं आहे. इथे खचाखच भरून असणारा कचरा मला जास्तच अनुभव देत आहे.अगदी निर्जीव गोष्टीदेखील तुम्हाला शिकवत असतात त्याप्रमाणे!  येणाऱ्या काही दिवसांत यावर काय काय फलनिष्पत्ती देणार याचा रोख