Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण

#मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण: शिक्षणाबाबतची माहिती मिळवून तिचे पालन करणे महत्वाचे का आहे? मुलांच्या वयाची पहिली 8 वर्षे अतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली 3 वर्षे. भावी काळातील आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो. ह्या कालावधीमध्ये मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो. किशोर आणि लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य  संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात.  जन्माची कायदेशीररीत्या नोंदणी होणे, आरोग्य संगोपन, पोषक आहार, शिक्षण, छळ आणि भेदभावापासून संरक्षण मिळणे हे सर्व मुलांचे अधिकार आहेत. ह्या अधिकारांचे आदरपूर्वक पालन, संरक्षण केले जात आहे हे पाहणे पालक आणि शासनाचे कर्तव्य आहे. मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षणाबाबत प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास कोणती माहिती मिळण्याचा हक्क आहे. वयाच्या पहिल्या 8 वर्षांमध्ये घेण्याेत आलेली काळजी व संगोपन, विशेषत: पहिल्या 3 वर्षांतील, अत्यंत महत्वाचे असते आणि त्याच्या किंवा तिच्या  आयुष्यावर ह्याचा प्रभाव पडतो. मुले जन्म घेतल्या क्षणीच शिकू लागतात. त्यांना योग्या आरोग्