Skip to main content

मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण

#मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण:

शिक्षणाबाबतची माहिती मिळवून तिचे पालन करणे महत्वाचे का आहे?


मुलांच्या वयाची पहिली 8 वर्षे अतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली 3 वर्षे. भावी काळातील आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो. ह्या कालावधीमध्ये मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो. किशोर आणि लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य  संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात. 
जन्माची कायदेशीररीत्या नोंदणी होणे, आरोग्य संगोपन, पोषक आहार, शिक्षण, छळ आणि भेदभावापासून संरक्षण मिळणे हे सर्व मुलांचे अधिकार आहेत. ह्या अधिकारांचे आदरपूर्वक पालन, संरक्षण केले जात आहे हे पाहणे पालक आणि शासनाचे कर्तव्य आहे.

मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षणाबाबत प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास कोणती माहिती मिळण्याचा हक्क आहे.

  1. वयाच्या पहिल्या 8 वर्षांमध्ये घेण्याेत आलेली काळजी व संगोपन, विशेषत: पहिल्या 3 वर्षांतील, अत्यंत महत्वाचे असते आणि त्याच्या किंवा तिच्या  आयुष्यावर ह्याचा प्रभाव पडतो.
  2. मुले जन्म घेतल्या क्षणीच शिकू लागतात. त्यांना योग्या आरोग्य संगोपन व पोषक आहार तसेच प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात आणि वाढतात.
  3. मुलांना खेळण्यास प्रोत्साहन दिले व त्यांचे कुतूहल जागृत ठेवले की त्यांची सामाजिक, भावनिक तसेच बौद्धिक पातळी वरील वाढ व विकास व्यवस्थित होतो.
  4. मुले त्यांच्या जवळ असणार्या व्यक्तींच्या वागण्याचे अनुकरण करून त्यानुसार वागणे शिकतात.
  5. मुलाची वाढ व विकास खुंटत असल्याचे धोक्याथचे संकेत पालकांना व संगोपनकर्त्यां ना ओळखता येणे आवश्यक आहे.

सहाय्यक माहिती - मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण

महत्वपूर्ण संदेश : वयाच्या पहिल्या 8 वर्षांमध्ये घेण्यानत आलेली काळजी व संगोपन, विशेषत: पहिल्या 3 वर्षांतील, अत्यंत महत्वाचे असते आणि त्याच्या किंवा तिच्या  आयुष्यावर ह्याचा प्रभाव पडतो.

पहिल्या वर्षात घेतलेल्या काळजीने व मिळालेल्या प्रेमाने मूल भरभरून वाढते. त्याच्या वाढीसाठी व भावनिक विकासासाठी त्याला प्रेमाने जवळ घेणे तसेच त्याच्याशी बोलणे फार महत्वाचे असते. आईच्या कुशीत असल्याने व गरजेनुसार स्तनपान मिळाल्यावर बाळाला सुरक्षित वाटते.
मुले व मुली यांच्याय शारीरिक, भावनिक, मानसिक व सामाजिक गरजा सारख्याच असतात, शिवाय दोघांची शिकण्याची क्षमतादेखील सारखीच असते. मुले व मुली दोघांना ही प्रेम व कौतुकाची सारखीच गरज असते.
आपली एखादी गरज सांगण्यासाठी रडणे ही मुलांची एक पध्दत आहे. अशावेळी त्यास जवळ घेऊन प्रेमाने बोलून त्याचे सांत्वन केल्यास विश्वासाचे व सुरक्षिततेचे नाते निर्माण होते.
फिकुटलेली, कुपोषित किंवा बहुतेक आजारी मुले नंतर घाबरट आणि उदास बनतात व इतर सर्वसामान्य मुलांमध्ये दिसणारा खेळण्याचा, शिकण्याचा व इतरांशी बोलण्याचा उत्साह त्यांच्यात आढळत नाही.खाण्यासाठीदेखील त्यांना विशिष्ट पद्धतीने प्रवृत्त करावे लागते.
मुलांमध्ये दिसणार्या भावना वास्तविक व सशक्ता असतात. एखादी गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे झाली नाही तर त्यांना विलक्षण दुःख होते. मुले साधारणापणे अंधाराला किंवा अनोळखी व्यक्तींना घाबरतात. मुलांच्या मताची किंवा भावनांची टिंगल केली, दुर्लक्ष केले किंवा त्याबद्दल त्यांना शिक्षा केली तर मोठेपणी अशी मुले लाजाळू किंवा घाबरट बनतात तसेच त्यांना आपल्या भावना नीटपणे व्यक्त करता येत नाहीत. मुलांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास पालकांनी किंवा संगोपनकर्त्यांनी संयमाने व सहानुभूतीने परिस्थिती हाताळल्यास अशी मुले आनंदी बनतात व त्यांची मनस्थिती संतुलित राहते.
मुलांना शारीरिक शिक्षा केल्याने किंवा  त्यांच्यासमोर हिंसेचा उद्रेक झाल्यास मुलांच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. रागाच्या भरात शिक्षा केली गेलेली मुले कालांतराने स्वतःच हिंसक बनतात. मूल त्याच्या कुटुंबाचा व समुदायाचा एक परिपूर्ण घटक बनण्यासाठी कुटुंबातील वागण्याबोलण्याची मार्गदर्शक तत्वे स्पष्ट असणे व त्याचबरोबर मुलास त्याच्या चांगल्या वर्तणुकीबद्दल बक्षीस किंवा उत्तेजन देणे गरजेचे आहे.
मुलांची काळजी घेण्यामध्ये आई-वडील अशा दोघांचाही सहभाग, कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर असणे आवश्यक आहे. वडिलांची भूमिका येथे अधिक महत्वाची आहे. मुलाची प्रेमाची व प्रोत्साहनाची गरज भागवण्याबरोबरच चांगले शिक्षण, पोषक आहार व आरोग्य संगोपन पुरवण्याचे काम वडील करू शकतात. मुलाभोवतीचे वातावरण सुरक्षित ठेवण्याची काळजी घेणे पित्यास शक्य आहे. घरातील स्त्री गर्भवती असताना किंवा मुलास दूध पाजत असताना वडिलांनी घरातील कामे करू शकतात.

महत्वपूर्ण संदेश : मुले जन्म घेतल्या क्षणीच शिकू लागतात. त्यांना योग्य आरोग्य संगोपन व पोषक आहार तसेच प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात आणि वाढतात.

जन्मानंतरच्या पहिल्या एका तासात होणारा आईचा स्पर्श व मिळणारे आईचे दूध ह्यामुळे बालकाचे व आईचे नाते घट्ट होऊन चांगल्या विकासास व वाढीस चालना मिळते.
स्पर्श, ऐकणे, वास येणे, पाहणे व चव घेणे ह्या पाच गोष्टींद्वारे मूल त्याच्याभोवतीच्या जगाचा अभ्यास करू लागते.
मुलांशी बोलण्याने, त्यांना स्पर्श केल्याने व जवळ घेण्याने, परिचित चेहरे दिसल्याने, ओळखीचे आवाज ऐकू आल्याने व विविध वस्तू हाताळण्यामुळे त्यांचा मानसिक विकास झपाट्याने होतो. जन्मापासूनच सुरक्षित वातावरण व प्रेम मिळाल्याने आणि कुटुंबियांशी संवाद साधण्याभने मुले वेगाने शिकतात. सुरक्षिततेची ही भावना मिळालेली मुले शाळेत चांगली प्रगती दाखवतात तसेच जीवनातील अडचणींवर सामान्यळत: अधिक चांगल्या प्रकारे मात करू शकतात.
पहिले 6 महिने, बाळाच्या इच्छेनुसार पाजलेले आईचे दूध, सहा महिने वयानंतर मिळणारा सुरक्षित व पोषक असा पूरक आहार व त्याचबरोबर दोन वर्षे किंवा  त्यापेक्षा जास्त काळापर्यंत चालू ठेवलेले स्तनपान ह्यामुळे मुलांची तब्येत तर चांगली राहतेच शिवाय त्यांना आईचे प्रेमदेखील लाभते.
मुलांच्या वाढी व विकासासाठी सर्वांत महत्वाचा मार्ग म्हणजे त्यांचा इतरांशी येणारा संपर्क. पालक व संगोपनकर्ते जितक्या जास्त वेळा मुलाशी बोलतील आणि त्याच्या शंकांना प्रतिसाद देतील तितके ते अनेक गोष्टी चटकन शिकेल. पालकांनी किंवा संगोपनकर्त्यां नी बालकाशी बोलणे, गाणे म्हणून किंवा  वाचून दाखवणे गरजेचे आहे. मुलांना प्रत्यक्ष शब्दार्थ समजला नाही तरी अशा तर्हेच्या ‘संवादा’ द्वारे त्यांची भाषाकौशल्ये व आकलनक्षमतेचा विकास होतो.
संगोपनकर्त्यांयनी लहान मुलांना सतत नवनवीन वस्तू पहायला, ऐकायला, खेळायला व हाताळायला देवून त्यांरना वेगाने शिकण्यास व समजून घेण्यारस मदत करावी.
लहान मुलांना फार काळ एकटे सोडू नये. अशाने त्यांची शारीरिक व मानसिक वाढ खुंटते. 
मुलींना मुलांइतकेच जेवण लागते व मुलांइतकीच त्यांनादेखील प्रेमाची, वात्सल्याची गरज असते. नवीन गोष्ट शिकल्यास, करून दाखवल्यास सर्व मुलांचे कौतुक करावे व त्यांना उत्तेजन द्यावे.
मुलांची शारीरिक व मानसिक वाढ योग्य रीतीने होत नसल्यास पालकांनी आरोग्यसेवकाचा सल्ला घ्यावा.
मुलांना पहिल्यांदा त्यांच्या मातृभाषेमधून शिक्षण दिल्याने स्वतःच्या भावना व्यक्त करणे त्यांना सोपे जाते. गाणी, गोष्टी, खेळ व कवितांमधून मुले भाषा चटकन शिकतात.
पोषणयुक्त आहार मिळालेली व वेळेवर लसीकरण झालेली मुले सहसा आजारी पडत नाहीत व त्यांची खेळण्याची, शिकण्याची व परस्परसंवादाची क्षमतादेखील बळावते. ह्यामुळे त्या कुटुंबाचा आरोग्यसेवांवर खर्च होणारा एकंदर पैसा तर वाचतोच शिवाय आजारपणामुळे मूल शाळेत न जाण्याचे प्रमाण कमी होऊन, आजारी मुलाची काळजी घेण्यामधील पालकांचे श्रम वाचतात तसेच त्यांनादेखील आजारी मुलासाठी रोजगार बुडवून घरी थांबावे लागत नाही.

महत्वपूर्ण संदेश :मुलांना खेळण्यास प्रोत्साहन दिले व त्यांचे कुतूहल जागृत ठेवले की त्यांची सामाजिक, भावनिक तसेच बौद्धिक पातळी वरील वाढ व विकास व्यवस्थित होतो.

मुले मौजमस्ती करण्यासाठी खेळतात, पण ह्या खेळण्यामधूनच त्यांचे शिक्षण व विकास मोठ्या प्रमाणावर होत असतो. खेळण्याने त्यांचे ज्ञान, अनुभव व आत्मविश्वास वाढून कुतूहल जागृत होते.
मुले एखादी गोष्ट नाना प्रकारे करून पाहतात, परिणामांची तुलना करतात, त्यासंबंधी प्रश्न विचारतात, समस्यांचा तोंड देतात व ह्यामधूनच ती शिकतात. खेळांमुळे त्यांचे भाषा व विचारसामर्थ्य, निर्णयक्षमता, योजकता व संघटनकौशल्य वाढते. अपंग मुलास खेळण्याकरता प्रवृत्त करणे त्या मुलासाठी फार महत्वाचे ठरते.
खेळण्याची व कुटुंबियांसोबत सुसंवाद साधण्याची मुलामुलींची गरज सारखीच असते. विशेषतः वडिलांबरोबर खेळल्याने परस्पसरांमध्येु स्नेहबंध अधिक सशक्ता होतो.
पालक किंवा संगोपनकर्त्यांणनी मुलास स्पष्ट सूचना देऊन त्यांच्याकडून सरळसाधी कामे करवून घ्यावी, खेळायला वस्तू किंवा खेळणी द्यावी, करण्यासाठी नवीन गोष्टी सुचवाव्या पण मुलाच्या  खेळावर अंमल बजावण्याचा प्रयत्न करू नये. मुलाचे जवळून निरीक्षण करा आणि मुलाचे म्हणणे व कल्पना माना.
अगदी लहान मूल एखादी गोष्ट कोणाच्या मदतीशिवाय स्वतःच करण्याचा हट्ट धरते तेव्हा संगोपनकर्त्यांानी संयमित राहणे आवश्य क आहे अशावेळी, मुलास थेट धोका पोहोचत नसल्यास, त्यास ते काम करू द्यावे. कारण एखादे नवीन  व कठिण काम पार पाडण्यासाठी करावा लागणारा संघर्ष त्या मुलाच्या विकासाचे सकारात्मक पाऊल आहे.
विकासाच्या विविध टप्प्यांवर मुलास योग्य त्या वेगवेगळ्या वस्तू खेळण्यासाठी पुरवाव्या. माती, वाळू, पाणी, पुठ्ठ्याची खोकी, लाकडी ठोकळे, डब्यांची झाकणे ह्या वस्तूंशीदेखील मुले, दुकानातून विकत आणलेल्या खेळण्याप्रमाणेच खेळू शकतात.
मुलांमध्ये सारखा बदल होत असतो व त्यांमध्ये नवनवीन क्षमता उत्पन्न होत असतात. संगोपनकर्त्यांानी हे बदल ध्यानात घेऊन तिचा किंवा त्यावचा विकास लवकर होण्यापस मदत करावी.

महत्वपूर्ण संदेश : मुले त्यांच्या जवळ असणार्या व्यक्तींच्या वागण्याचे अनुकरण करून त्यानुसार वागतात.

इतरांचे निरीक्षण करून व त्यांच्याप्रमाणे वागण्यामधून मुले समाजात कसे मिसळावे हे शिकतात. तसेच कशाप्रकारची वागणूक स्वीकारली जाते व कोणती नाही हेदेखील त्यांना समजते.
मुलाच्या वागण्याबोलण्यास व व्यक्तिमत्वास आकार देणारे महत्वाीचे उदाहरण म्हणजे त्याच्या आसपासच्या मोठ्या माणसांचे व वयाने मोठ्या मुलांचे वागणे होय. मुले इतरांच्या वागण्याचे अनुकरण करतात, लोक जे सांगतात त्याचे नव्हे. पालकांनी आरडाओरडा किंवा  मारहाण केल्यास मुले तसे वागायला शिकतात. मोठ्यांचे इतरांशी वागणे सौजन्याचे, आदराचे व संयमाचे असल्यास मुले त्याचे अनुकरण करतात.
मुलांना दुसर्याची भूमिका वठवणे किंवा ढोंगीपणा करणे आवडते. हे देखील त्यास करू द्यावे कारण ह्यामधून त्यास इतरांची विचारसरणी समजून घेण्याेस आणि स्वीदकारण्या स मदत मिळते.

महत्वपूर्ण संदेश : मुलाची वाढ व विकास खुंटत असल्याचे धोक्याचे संकेत पालकांना व सगोपनकर्त्यांना ओळखता येणे आवश्यक आहे.

पालकांना व संगोपनकर्त्यांयना मुलाच्या विकासामधील महत्वाचे टप्पे माहीत असणे आवश्यक आहे. मुलामध्ये शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असल्यास ते ओळखून वेळेवर तज्ञांची मदत घेणे व अशा मुलास प्रेमाने काळजीपूर्वक वाढवणे गरजेचे असते.
सर्व मुले सारख्याच पध्दतीने वाढतात, पण प्रत्येक मूल त्याच्या् किंवा तिच्यात स्वत:च्या दराप्रमाणे विकसित होते. 
ऐकणे, पाहणे व स्पर्श ह्या गोष्टींना मुलाकडून मिळणार्या प्रतिसादांचे निरीक्षण करून पालकांना किंवा संगोपनकर्त्यांना विकासामधील भविष्यकालीन समस्यांची किंवा पंगुत्वाची पूर्वसूचना मिळू शकते. मुलाचा विकासदर मंद असल्यास पालकांनी अशा मुलासोबत अधिक वेळ घालवावा, त्याच्याशी बोलावे, खेळावे व त्यास मसाज करावा (अंग चोळावे).
मूल जर त्यास मिळणार्या प्रोत्साहनाला प्रतिसाद देत नसेल तर पालकांनी आणि संगोपनकर्त्यां नी तज्ञांचा सल्ला घ्यावा. अपंगत्व फार वाढण्यापूर्वीच वेळेवर उपचार सुरू करणे फार आवश्य क आहे. पालकांनी व संगोपनकर्त्यां नी मुलाकडे असलेल्या क्षमतांचा पुरेपूर विकास होण्याहस प्रोत्सा हन द्यावे.
अपंग मुलास किंवा मुलीस अधिक प्रेमाची व संरक्षणाची गरज असते. इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे, अशा मुलाची जन्मनोंदणी करणे, त्यास आईने स्वतःचे दूध पाजणे, लसीकरण करणे व त्यास पोषणयुक्त अन्न देऊन छळ किंवा दुर्वर्तनापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. तसेच अशा मुलांना इतर सर्वसामान्य मुलांबरोबर खेळण्यासस प्रोत्सा हन द्यावे.
मनाने दुःखी असलेले किंवा मानसिक तणावाखाली असलेले मूल कधीकधी जगावेगळे वागते. अशी मुले अचानक मैत्री तोडतात, दुःखी, आळशी किंवा खोडकर बनतात. सारखी रडतात, इतर मुलांना मारतात. खेळण्यासऐवजी एकटे बसून राहतात, त्यांचा शाळेतील उत्साह कमी होतो. त्यांची भूक व झोपदेखील कमी होते.
  • अशावेळी पालकांनी अशा मुलाशी बोलावे, त्याचे म्हणणे समजून घ्यावे. तरी ही समस्या कायम राहिल्यास शिक्षक किंवा आरोग्यसेवकाचा सल्ला घ्यावा.
  • मूल मनात दुःखी असेल, त्याचा छळ होत असेल किंवा ते मानसिक तणावाखाली असेल तर अधिक नुकसान टाळण्यासाठी त्याला किंवा तिला समुपदेशन देण्याची (काउन्सिलिंगची ) गरज असते.
खालील मार्गदर्शकामधून पालकांना मुलांच्या विकासासंबंधीच्या काही गोष्टी स्पष्ट होतील. सर्व मुलांच्या वाढ व विकासदरामध्ये थोडाफार फरक असतोच. काही मुलांमध्ये हळूहळू प्रगती होणे देखील सर्वसामान्य असू शकते तर काही वेळा पोषक अन्नाचा अभाव, नाजूक तब्येत, प्रेरणेचा अभाव अशी वा ह्यापेक्षा गंभीर कारणे देखील त्यामागे असू शकतात. पालकांनी शिक्षक किंवा प्रशिक्षित आरोग्यसेवका बरोबर मुलाच्या प्रगतीची चर्चा करावी.

मुलांचा विकास कसा होतो

एक महिना वयापर्यंत

वय एक महिना असताना बाळास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत -
  • तिच्‍या किंवा त्‍याच्‍या गालाला हात लावल्यास त्या दिशेने आपले डोके वळवणे.
  • दोन्ही हात स्वतःच्या तोंडाकडे आणणे.
  • ओळखीचे आवाज ऐकल्यावर त्या दिशेने मान फिरवणे.
  • स्तन शोधून दूध ओढणे व स्तनास हात लावणे.
पालकांसाठी व संगोपनकर्त्‍यांस सल्ला -
  • जन्मानंतरच्या पहिल्या तासामध्ये स्तनपान द्यावे व मुलास जवळ घ्यावे.
  • मूल उभे धरल्यास त्याच्या मानेला व डोक्यास आधार द्यावा.
  • मुलास वारंवार जवळ घेऊन त्याचे अंग चोळावे.
  • आपण स्वतः दमलेल्या किंवा चिडलेल्या स्थितीत असलो तरी ही बाळाला हळुवारपणे हाताळावे.
  • किमान दर चार तासांनी आईने बाळास स्वतःचे दूध पाजावे.
  • जास्तीतजास्त वेळा मुलाशी बोलावे, त्यास वाचून दाखवावे किंवा गाणी म्हणावी.
  • जन्मानंतर सहा महिन्यांनी बाळास आरोग्यसेवकाकडे न्यावे.
धोक्‍याच्‍या संकेतांकडे लक्ष ठेवा:
  • बाळाने योग्य रीतीने अंगावर दूध न पिणे किंवा दूध पिण्याचे नाकारणे
  • हातापायांची हालचाल अत्यंत कमी
  • मोठा आवाज किंवा प्रखर प्रकाशाबाबात विशेष काही प्रतिक्रिया न देणे
  • कारणाशिवाय तासनतास रडणे
  • उलट्या व जुलाब होणे, ज्‍यामुळे शुष्कता (डीहायड्रेशन) होऊ शकते)

वय सहा महिने असताना

बाळास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत:
  • पोटावर (पालथे) झोपल्यानंतर डोके व छाती उचलता येणे
  • टांगलेल्या वस्तूकडे हात नेणे
  • वस्‍तुपर्यंत पोचणे व हलविणे
  • दोन्ही बाजूंनी कुशीवर वळणे
  • आधाराने बसणे
  • हाताचा व तोंडाचा वापर करून वस्तूचा अभ्यास करणे
  • इतरांच्या आवाजांची व चेहर्‍यावरील भावांची नक्कल करणे
  • स्वतःचे नाव उच्चारल्यास त्यास प्रतिसाद देणे, परिचित चेहरे ओळखणे
पालक व संगोपनकर्त्‍यांसाठी सल्ला:
  • बाळास स्वच्छ, सपाट व सुरक्षित जागेवर ठेवावे म्हणजे त्याला सहजपणे हालचाल करता येईल व वस्तू पकडता येतील.
  • बाळास धरताना किंवा त्यास बसवल्यावर त्याला आसपास काय चालले आहे ते दिसणे आवश्यक आहे.
  • दिवसा व रात्रीदेखील, बाळाच्या गरजेनुसार, त्यास स्‍तनपान द्यावे व इतर अन्न देणे देखील सुरू करावे (6 - 8 महिन्याच्या मुलास दिवसातून 2 वेळा व 8 - 12 महिन्याच्या मुलास दिवसातून 3-4 वेळा).
  • शक्य तेवढा वेळ मुलाबरोबर बोला, वाचून दाखवा किंवा गाणी म्हणा.
धोक्‍याच्‍या संकेतांकडे लक्ष ठेवा:
  • हातापायाची हालचाल नैसर्गिक नसणे किंवा त्‍यासाठी त्रास होणे
  • सतत मान फिरवणे (कानामध्ये जंतुसंसर्ग असू शकतो व वेळीच तपासणी न केल्यास त्याचे रूपांतर बहिरेपणात होऊ शकते)
  • आईचे दूध पिण्यास, आवाजांना किंवा  नेहमीच्या चेहर्‍यांना कमी प्रतिसाद
  • आईचे दूध किंवा इतर अन्न घेण्याचे टाळणे

वय एक वर्ष असताना

बाळास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत:
  • आधारशिवाय बसणे
  • हातापायावर रांगणे व उभे राहणे
  • आधार दिल्यावर पावले टाकणे
  • ऐकलेल्या आवाजांची व शब्दांची नक्कल करणे व सरळसाधी कामे समजणे
  • टाळ्या वाजवणे व खेळणे
  • आवाजांची व लक्षवेधी हावभावांची नक्क्ल करणे
  • आंगठा व एका बोटाच्या वापराने वस्तू उचलणे
  • वाटी-चमचा धरता येणे, मदतीशिवाय खाण्याचा प्रयत्न करणे
पालक व संगोपनकर्त्‍यांस सल्ला:
  • मुलाशी शक्य तितका वेळ बोला, खेळा, त्याला वस्तू बोटाने दाखवून नावे सांगा.
  • जेवणाच्या वेळी सर्व कुटुबियांसमवेत गप्‍पांना प्रोत्‍साहन द्या.
  • मुलाची वाढ मंद असल्यास किंवा त्यास काही शारीरिक अपंगत्व असल्यास त्याला ज्या गोष्टी व्यवस्थित करता येतात त्यांचेवर अधिक भर द्या. त्यास अधिक उत्तेजन द्या व त्याच्या बरोबर जास्त वेळ घालवा.
  • मुलास एकाच स्थितीत जास्‍त तास वेळ ठेऊ नका.
  • अपघात टाळण्यासाठी परिसर सुरक्षित ठेवा.
  • त्याचे स्तनपान सुरू ठेवा, त्यास गरजेनुसार विविध प्रकारचे अन्न द्या
  • मुलाला वाटी-चमच्याने स्वतः खाण्यासाठी मदत करा.
  • मुलाचे लसीकरण पूर्णपणे झाल्याची खात्री करा व शिफारस केल्यानुसार पूरक सूक्ष्मपोषके मिळाली आहेत याकडे लक्ष द्या.
धोक्‍याच्‍या संकेतांकडे लक्ष ठेवा:
  • मुलाने आवाजांना प्रतिसाद न देणे
  • त्याने हालत्या वस्तूंकडे न पाहणे
  • मूल अनुत्साही असणे व त्‍याने संगोपनकर्त्‍यांस प्रतिसाद न देणे
  • त्याची भूक मंदावणे किंवा त्याने अन्न न खाणे

वय दोन वर्षे असताना

बाळास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत:
  • चालणे, चढणे किंवा पळणे
  • नांव घेतल्‍यावर चित्रातील किंवा प्रत्यक्षातील वस्तू ओळखणे (उदा.नाक,डोळे)
  • (साधारण दीड वर्षे वयानंतर) एकापाठोपाठ अनेक शब्द बोलणे
  • साध्या सूचना पाळणे
  • पेन्सिल किंवा रंगकांडी (क्रेयॉन) दिल्यास रेघा मारणे,गिरगिटणे
  • साध्या गोष्टी, गाणी इ. चा आनंद घेणे
  • इतरांच्या वागण्याची नक्कल करणे
  • स्‍वत:च्‍या हातांनी जेवण्‍यास किंवा खाण्‍यास सुरूवात करणे
पालक व संगोपनकर्त्‍यांस सल्ला:
  • मुला बरोबर खेळ खेळा,बोला, वाचा.
  • धोकादायक वस्‍तूंपासून दूर राहणे शिकवा.
  • मुलाशी सामान्‍य भाषेत बोला, लहान मुलासारखे नव्हे (बोबडे)
  • त्‍याला स्तनपान देणे चालू ठेवा, त्यास गरजेनुसार विविध प्रकारचे अन्न द्या
  • मुलास खाण्‍यासाठी प्रोत्‍साहन द्या, पण जबरदस्ती करू नका
  • वागणुकीचे सरळसाधे नियम शिकवा, त्याच्याकडून योग्‍य त्‍याच अपेक्षा करा
  • मुलाने साध्य केलेल्या गोष्टींचे कौतुक करा
धोक्‍याच्‍या संकेतांकडे लक्ष ठेवा:
  • मुलाने इतरांना प्रतिसाद न देणे
  • चालताना तोल जाणे (प्रशिक्षित आरोग्यसेवकास भेटा)
  • जखमा होणे, वागणुकीतील अनपेक्षित बदल (विशेषतः मुलाचा सांभाळ इतर कोणी करीत असल्‍यास)
  • भूक कमी होणे

वय तीन वर्षे असताना

मुलास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत -
  • सहज चालणे,चढणे,धावणे,लाथ मारणे, उड्या मारणे
  • चित्रातील किंवा प्रत्यक्षातील सामान्‍य वस्तू बोट दाखवून ओळखणे
  • दोन किंवा तीन शब्दांची छोटी वाक्ये बनवणे
  • स्वतःचे नाव व वय सांगता येणे
  • रंगांची नावे सांगणे
  • अंक ओळखणे
  • खेळताना खोट्या वस्तूंचा इ. वापर करू शकणे (मेक-बिलीव्‍ह)
  • स्‍वत:च्‍या हातांनी जेवणे-खाणे
  • प्रेम व्यक्त करू शकणे
पालक व संगोपनकर्त्‍यांस सल्ला:
  • मुलाबरोबर पुस्तके पहा, वाचा व त्यामधील चित्रांबाबत चर्चा करा
  • मुलास गोष्टी सांगा, गाणी व बालगीते शिकवा
  • मुलास खाण्यासाठी त्याची स्‍वत:ची ताटवाटी इ. द्या.
  • मुलास स्वतंत्रपणे खाऊ द्या, त्यासाठी त्याला जास्त वेळ लागला तरी चालेल.
  • कपडे घालणे, हात स्वच्छ धुणे, स्वच्छतागृहाचा वापर करणे इ. गोष्टी शिकण्यास मुलाची मदत करा.
धोक्‍याच्‍या संकेतांकडे लक्ष द्या:
  • खेळण्यावरून मन उडणे
  • सारखे पडणे
  • छोट्या वस्तू नीट हाताळता न येणे
  • साध्या सूचना न समजणे
  • पुष्‍कळसे शब्द वापरून बोलता न येणे
  • अन्‍नावरील वासना उडणे

वय पाच वर्षे असताना

मुलास खालील गोष्टी करता आल्या पाहिजेत:
  • सुसंगत हालचाल करणे
  • वाक्ये बोलणे व विविध शब्दांचा वापर करणे
  • विरुद्धार्थाची संकल्पना समजणे (उदा. जाड-बारीक, उंच-बुटका इ.)
  • इतर मुलांबरोबर खेळणे
  • मदतीशिवाय कपडे घालणे
  • सोप्या प्रश्नांची उत्तरे देणे
  • 5 ते 10 वस्तू मोजता येणे
  • स्वतःचे हात धुणे
पालक व संगोपनकर्त्‍यांसाठी सल्ला:
  • मुलाचे बोलणे नीट ऐका
  • मुलाशी सतत संवाद ठेवा.
  • मूल बोलताना अडखळत असल्यास, त्यास सावकाश बोलायला सांगा.
  • गोष्टी वाचा, सांगा.
  • त्याला खेळण्यास व कुतूहल जागृत ठेवण्यास उद्युक्त करा.
धोक्‍याच्‍या संकेतांकडे लक्ष द्या:

  • मुले खेळताना कोणत्या भूमिका वठवतात ते पहा. तसेच मूल घाबरट, रागीट किंवा हिंसक असेल तर ही मानसिक समस्यांची व छळाची लक्षणे आहेत असे समजा

 स्रोत: विकासपेडीया

Comments

Popular posts from this blog

Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या ...

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे