Skip to main content




' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास '
तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार?
माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत.
आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत!
शिक्षण हे सर्वांसाठी सहज योग्य उपलब्ध असणारे प्रत्येकाच्या खिशाला परवडणारे  साधन असले पाहिजे.मूलभूत शिक्षण कायद्याअंतर्गत मोफत शिक्षणाची सक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी तर होतेय पण गुणवत्ता आणि संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे.शिक्षणासारख्या क्षेत्राचे खाजगीकरण होत असताना सरकारी शाळांकडे होणारे दुर्लक्ष हेच शिक्षणाचा दर्जा घसरण होण्याचे दर्शक ठरतंय.मी पाहतोय अनुभवतोय की, शाळांत संकल्पनाआधारित शिक्षणाची नेहमीच वानवा भासलेली आहे. मागील महिन्यात माझ संशोधनकार्य करण्यासाठी मी  चंद्रपूर येथे गेलो होतो. तेथील संशोधनाअंती नोंदवलेल्या निरीक्षणांपैकी दोन निरीक्षणे महत्त्वाची आहेत.ती ही आहेत की ,प्रत्येक घरातून प्रति वर्षी साधारण एक किलोपेक्षा लोखंड अथवा तत्सम वस्तू आणि कमीत कमी एक तेलाचा डबा स्क्रॅप म्हणून निर्माण होतो. आता तुम्हाला वाटेल की या निरीक्षणांचा याठिकाणी काय संबंध? हो संबंध आहे म्हणूनच  त्याचा मी संदर्भ दिला आहे. स्वच्छता आणि घन कचराव्यवस्थापन  हे शिक्षण पद्धतीत सुधारणा करण्यासाठी कशापद्धतीने फायद्याचे ठरू शकते याचे सर्वोत्तम उदाहरण वरील निरीक्षणात देतात. IGNITED MINDS हा उपक्रम याचे सार्थ उदाहरण आहे.हा उपक्रम अशापद्धतीच्या लोखंड आणि तेलाच्या डब्याचा पुनर्वापर करून शैक्षणिक सुधारणा आणि शिक्षणासहित्याच्या निर्मितीसाठी करतो. वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळी व्यवस्थापन ,पोषण, विज्ञान ,गणित ,भूगोल, मूल्यशिक्षण ,इंग्रजी, मराठी अंगणवाडी साठी मूल्याधारित खेळसाहित्य आणि शिक्षणसाहित्याची उपलब्धता ही या घनकचऱ्याच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 48 वेगवेगळे मॉडेल्स आणि अंगणवाडीसाठी पंधरा वेगवेगळी मॉडेल्स आधारित हा उपक्रम बनविला गेला आहे .तेलाचे डबे आणि लोखंड यावर पुनर्वापर प्रक्रिया करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची साधने तेथील विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. परिणामी सरकारी शाळांकडे पाहण्याचा पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन यामध्ये नक्कीच बदल होण्यास मदत होणार आहे .इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे सर्व मॉडेल्स माहितीसाठी उपलब्ध आहेत. शाळेच्या सर्व गरजांची योग्य अभ्यास करून त्यांची पूर्तता करून शाळाबाह्य स्वरूप आकर्षक करण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास देखील होण्यास याची मदत होईल.

सायन्स पार्क या संकल्पनेवर आधारित भारतातील काही मेट्रो सिटीमध्ये काही मॉडेल्स उभारले आहेत.परंतु या विज्ञान संकल्पनेवर आधारित  घनकचरा व्यवस्थापनातून सरकारी शाळांमध्ये सायन्स पार्क सारख्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलांना सायन्स पार्क पाहण्यासाठी आता कुठल्याही मेट्रो सिटी मध्ये जाण्याची गरज नाही. ते सायन्स पार्क ,शिक्षण बगीच्या आता ग्रामीण भागातच सरकारी शाळांमध्ये उपलब्ध करता येत आहेत. ज्याप्रमाणे अॅग्रो टुरिझम, मेडिकल टुरिझम सारख्या गोष्टी जम बसवू लागल्या आहेत त्याच पद्धतीने शिक्षणातील मॉडेल म्हणून ' एज्युकेशन टुरिझम ' ही संकल्पना भविष्यात उदयास आली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही.
-अतुल संगीता आत्माराम
9527544478
Email- atularaut1992@gmail.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’ PC:www.wildfilmindia.com (देशाचे  मा.पंतप्रधान स्वच्छतेवर खूपच आक्रमक असून नेहमीच त्याबाबत कोणत्या न कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात व्यस्त असतात.हा लेख लिहिण्याचं प्रयत्न मा.पंतप्रधान आणि त्यांच्या स्वच्छताविषयक योजना आणि विचारांनी प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने ‘स्वच्छता दूत’ असणाऱ्या माझ्या साऱ्या भारतातील माता भगिनींना समर्पित. #’स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’# मी सायंकाळी  गॅलरीमध्ये चहा पीत  उभा होतो आणि माझी नजर गलरीमधून सायंकाळच्या होणाऱ्या हालचाली टिपण्यात व्यस्त होती.समोरील एका घरासमोर एक मुलगी अंगण झाडत होती.आणि समोरच्या नालीवर काही तळीराम चार्जिंग होऊन बसले होते.मी मात्र ते दृश्य पाहून स्वच्छतेच्या विचारात व्यस्त झालो. बसलेल्या तळीराम फालतू गोष्टी करण्यासोबतच त्या मुलीकडे पाहून एकमेकांना खुणावत होते.ती मुलगी हाताने झाडू घेऊन झाडत होती आणि दुसऱ्या हाताने आपली इज्जत वर तळीरामच्या नजरेतून वाचवण्यासाठी संघर्ष करत होती.बाजूच्याच दुकानात टीव्हीवर नुकताच मा.देशाच्या पंतप्रधान कडून झालेल्या ‘मन की बात’ वर चर्चा चालू होती.मा....

घनकचरा व्यवस्थापनाचा सुप्त किडा

 टाटा इन्स्टिट्यूट मधून पाणी,स्वछता आणि आरोग्य व्यवस्थापन विषयात पदवी घेऊन  मी युनिसेफ संस्थेसाठी काम करत आहे.जेव्हापासून मी WASH कोर्सला प्रवेश घेतलंय, तेव्हापासून जिथं कुठं  मला घनकचरा दिसतोय-तेव्हा माझ्यातील सुप्त किडा मला नेहमीच आव्हान करत होता. "अरे अतुल,एवढा तुझ्यासमोर कचरा दिसतोय आणि तू काहीच करत नाहीयेस ?" असं बोलल्याप्रमाणे तो मला जणू शह देत होता. माझ्यासह अखिल मानवजात त्यांच्या दैनंदिन जीवनात कोट्यवधी किलोचा कचरा निर्माण करून पृथ्वीवर साठवत आहे.आणि फार कमी लोक त्याच्या व्यवस्थापणासाठी काम करत आहेत.  मी यवतमाळ येथील उमरी गावातील एका संस्थेत मागच्या एक आठवड्यापासून मुक्कामी आहे.येण्याचं प्रयोजन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. अभियांत्रिकी आणि सामाजिक विज्ञान शास्त्रातील माझ्या पदवीचा उपयोग या ठिकाणी पुरेपूर करून शिक्षण,पोषण आणि पर्यावरण विषयात दखलपात्र काम करता येऊ शकतं का ? याचाच मला अनुभव घ्यायचं आहे. इथे खचाखच भरून असणारा कचरा मला जास्तच अनुभव देत आहे.अगदी निर्जीव गोष्टीदेखील तुम्हाला शिकवत असतात त्याप्रमाणे!  येणाऱ्या काही दिवसांत यावर काय काय फलनिष्पत्ती ...