Skip to main content

'
उपेक्षेच्या धनी झालेल्या - आदिवासी महिला संशोधक'
या फोटोतल्या बाया तशा दिसायला साध्यासुध्या आहेत. मान्हेरे, आंबेवंगण, पिंपळदरावाडी, कोंभाळणे, एकदरे, खिरविरे या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागातल्या आदिवासी पाड्यांवर त्या वस्तीला असतात. त्यांच्या कार्यकर्तृत्त्वामुळं त्या अलीकडे उजेडात येताय. साध्यासुध्या दिसणाऱ्या या बायांचं असामान्य कर्तृत्व कोणते? ते समजून घ्यायला हवे.
*1)हिराबाई लहू गभाले* या ग्रामीण बँकर आहेत. मान्हेरे येथे त्या राहतात. बचत गटाच्या माध्यमातून शेकडो महिलांना स्वयंरोजगारासाठी भांडवल देत त्यांना पायावर उभे केलेय. कितीतरी कुटुंबांचे स्थलांतर तिने रोखले आहे.
*2)ममताबाई देवराम भांगरे* :-ज्यांच्या सेंद्रीय शेतीतील प्रयोगांनी देशाचे लक्ष वेधलेय त्या देवगावच्या ममताबाई देवराम भांगरे देशाच्या शेती धोरणात ममताबाई यांची केसस्टडी प्रसिद्ध झालीय, यावरुन त्यांच्या भात पिकातील संशोधनाचा अंदाज यावा! आयआयटी, आयआयएममधले प्रोफेसर, विद्यार्थी, धोरणकर्ते इथे येऊन, ममताबाईंकडून व्यवस्थापन आणि संशोधन याचे धडे घेताय! त्यांचं काम समजून घेत अभ्यास करताय.
*3)सोनाबाई विठ्ठल भांगरे* हे पिंपळदरावाडी येथील असेच मुलखावेगळं व्यक्तिमत्त्व! यांना जलतज्ज्ञ कोण म्हणणार कारण त्यांचा रिसर्च पेपर एखाद्या जर्नलमध्ये पब्लिश झालेला नाहीये ना म्हणून! मात्र त्यांचं काम थोर आहे. बाएफ स्वयंसेवी संस्थेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेले बंधारे बघायला देशोदेशीचे लोक येतातय. नैसर्गिक झऱ्यांचा, प्रवाहांचा कोंडलेला, गुदमरलेला श्वास त्यांनी मोकळा केलाय. ते पाणी उताराच्या दिशेनं घरांत आणलंय. केवढं मोठं इनोवेशन आहे हे!
*4)शांताबाई खंडू धांडे* यांचा वेश बावळा आहे. काळ्या आईत कष्ट करताना त्या तिच्याशी एकरूप झालेल्या! यांचं वैशिष्ट्य हे की त्यांच्या आंबेवंगण येथील घराची कौलं दिसत नाहीत. का? तर त्यांच्या परसबागेतल्या वेलींनी छताचा, भिंतीचा ताबा घेतलाय. वर्षभर घरावर, परसात त्या भाजीपाला घेतात, तो पण सेंद्रीय बरं का? रोज रोज ताजी ताजी भाजी! भारीय की नाही? यांची परसबाग आणि 'वेलींचे घर' बघायला तर जगभरातले अभ्यासक, जिज्ञासू येतात! (यांनाही कोणी परसबागतज्ज्ञ म्हणत नाही बरं का!) नाही म्हणू देत त्याने काय फरक पडतो. चिखलात, मातीत पाय रोवून उभी असलेली, वेलींशी घट्ट जैविक नातं असलेल्या शांताबाईंना काहीही फरक पडत नाही... आपलं काम आणि आपण भले, असा त्यांचा एकूण खाक्या दिसतो!
*5)हिराबाई हैबती भांगरे* यांचेही असेच काहीतरी भन्नाट काम आकार घेतेय बरं. एकदरे येथील त्यांच्या वस्तीजवळ भातसंशोधन केंद्र उभे राहतेय. कृषी विद्यापीठातल्या संशोधकाहून अधिक गोष्टी जाणतात या.
*6)राहीबाई पोपेरे* :- रघुनाथ माशेलकर यांनी 'सीडमदर'(बीजमाता) म्हणून ज्यांचा गौरव केलेलाय त्या राही मावशींना तर आपल्यापैकी अनेक लोक ओळखतात! अलीकडे त्या प्रकाशात आल्याय. बीबीसीने गौरवलेल्या जगभरातल्या १०० महिलांत मावशींचा समावेश आहे!त्यांची बियाणे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
*7)पेढेकर मावशी* या फोटोत बिताका या अत्यंत दुर्गम गावातली पेढ़ेकर नामक महिला नाहीये. देशी गायी पाळणाऱ्या या महिलेने दूध आणि खवा विकून कुटुंबासाठी बेगमी केलेली आहे.
या सगळ्याजणी ग्रामीण, आदिवासी भागातल्या खऱ्याखुऱ्या आयडॉल आहेत!
महाराष्ट्राच्या कोपऱ्यात, सह्यगिरीच्या गिरीकंदरात अकोले तालुक्यातील या आदिवासी महिला म्हणजे उपेक्षेच्या धनी आहेत. मात्र वेगळी वाट निर्माण करणारं, त्यांचं काम दुर्लक्षितच राहिलं आहे, याची खंत आहे मनात. अर्थात त्यांना याचं काही पडलेलं नाहीये. जीवन-मरणाच्या संघर्षात हातपाय हलवताना, अभावात जगताना इनोवेशन कसे जन्माला येते, हे राज्याच्या कारभारी मंडळीनी इथे येऊन, बांधावर शेतात बसून समजून घ्यायची गरज आहे. कृषी विद्यापीठातल्या संशोधकांचं संशोधन आम्ही नाकारत नाहीत, मात्र पिढीजात ज्ञान ज्यांच्या जीन्समध्ये, डीएनएमध्ये आहे, ज्यांनी 'करुन दाखवलं' आहे. त्या अंगीकृत कामाकडे धोरणकर्त्यांनी, प्रसारमाध्यमांनी, धुरीणांनी दुर्लक्ष करणे म्हणजे मोठी आत्मवंचना ठरेल. विद्यापीठातले संशोधन आणि शेतातले काम हे ज्ञानाचं राजकारण बाजूला ठेवून निकोप दृष्टीने, डोळे उघडे ठेवून ग्रामीण भागातील संशोधन, इनोवेशन समजून घेऊन धोरणांनाही दिशा द्यायची गरज आहे. अन्यथा तुमच्या शेतीविषयक धोरणांना मातीचा वास कधीही येणार नाही. त्यातून शेती आणि शेतकऱ्यांचं भलं होण्याची शक्यता धुसर वाटते. बाएफ संस्था, या स्वयंसेवी संस्थेतले सर्व जाणते आणि कार्यकर्ते अधिकारी तसेच जितीन साठे यांनी विशेषकरुन या कामाला साथ दिलीय, त्यांच्याविषयी मनातून कृतज्ञ भाव आहेत!
(Post from Tribal India Fb Page)

Comments

Popular posts from this blog

Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या ...

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे