विदर्भाच्या रानभाज्या - १. टाकळा टाकळा (तरोटा) शास्त्रीय नाव - Cassia tora (कॅसिया टोरा) कूळ - Caesalpinaceae (सिसालपिनेसी) टाकळा ही वर्षायू वनस्पती ‘‘सिसाल-पिनेसी’’ म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. या वनस्पतीला काही भागांत ‘तरोटा’ किंवा ‘तरवटा’ अशी स्थानिक नावे आहेत. टाकळा हे तण पडीक ओसाड जमिनीवर, शेतीत, बागांमध्ये, जंगलात, रस्त्यांच्या कडेने सर्वत्र वाढलेले असते. टाकळ्याच्या बिया भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो. टाकळ्याची भाजी: टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर आहे व मलसारक आहे. पाककृती - कृती १ - फुले येण्यापूर्वीची कोवळी पाने भाजीसाठी वापरावीत. साहित्य - कोवळी पाने, कांदा, ओली मिरची, ...
This blog updates you about WASH sector happenings. WASH-water,Sanitation and Hygiene,Education,Livelyhoods and many.