Skip to main content

विदर्भाच्या रानभाज्या

 विदर्भाच्या रानभाज्या -

१. टाकळा


टाकळा (तरोटा)


शास्त्रीय नाव - Cassia tora (कॅसिया टोरा) 

कूळ - Caesalpinaceae (सिसालपिनेसी) 


टाकळा ही वर्षायू वनस्पती ‘‘सिसाल-पिनेसी’’ म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. या वनस्पतीला काही भागांत ‘तरोटा’ किंवा ‘तरवटा’ अशी स्थानिक नावे आहेत. टाकळा हे तण पडीक ओसाड जमिनीवर, शेतीत, बागांमध्ये, जंगलात, रस्त्यांच्या कडेने सर्वत्र वाढलेले असते. टाकळ्याच्या बिया भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो.

टाकळ्याची भाजी:

टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर आहे व मलसारक आहे. 


पाककृती -

कृती १

 - फुले येण्यापूर्वीची कोवळी पाने भाजीसाठी वापरावीत. 

साहित्य - कोवळी पाने, कांदा, ओली मिरची, तेल, आले, मीठ, ओले खोबरे, हळद, गूळ इ. 

कृती - पाने स्वच्छ धुऊन, पाणी गळून जाऊ द्यावे. कढईत तेल टाकून कांदा परतून घ्यावा, मग त्यात ओली मिरची व हळद टाकावी. नंतर त्यावर बारीक चिरलेली भाजी टाकून ती वाफेवर शिजू द्यावी. भाजी शिजत आली, की त्यात थोडा गूळ आणि मीठ घालावे. त्यावर ओले खोबरे घालावे. या भाजीत भिजवलेली तूरडाळ किंवा फणसाच्या आठळ्यांचे बारीक तुकडे ती शिजत असताना टाकल्यास भाजी अधिकच चवदार बनते. 


कृती 2:

साहित्य - दीड वाटी टाकळा पाला (कोवळा पाला देठे काढून चिरावा), अर्धी वाटी चिरलेला कांदा, ५ ते ६ ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या, मीठ, तिखट, तेल, मोहरी, हिंग, हळद, गूळ इ. 

कृती - जरा जास्त तेलावर कांदा, लसूण परतावे, त्यावर चिरलेली भाजी घालून झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. गरज वाटल्यास पाण्याचा हबका मारावा. तिखट, मीठ, गूळ घालून शिजवून घ्यावे. 


कृती ३:

 टाकळ्याचे रायते - 

साहित्य - एक वाटी टाकळ्याची पाने, चिंचेचा कोळ व गूळ, हिरवी मिरची, मोहरी पूड, पाणी, मीठ इ. 

कृती - पाने व मिरच्या सोबत वाटावे. त्यात गूळ, चिंचेचा कोळ, मीठ घालावे. मोहरी पूड पाण्यात फेसून घालावी. 


कृती ४:

 टाकळ्याची तंबळी 

साहित्य- एक वाटी टाकळ्याची पाने, एक वाटी ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, दीड वाटी ताक, चिंच, मिरे, जिरे, तूप, मीठ इ. 

कृती - कढईत तुपावर मिरची व पाने परतावीत. त्यात मिरे, जिरे घालून दोन मिनिटे परतावे. मग अन्य साहित्य मिक्सरमध्ये घालून वाटावे आणि नंतर ताकात मिसळावे. पोटाच्या विकारासाठी तंबळी उपयुक्त आहे.

(माहितीचा स्रोत:मराठी विकासपीडिया)

शब्दांकन:अतुल (पिंपरी खंदारे,बुलढाणा)


Comments

Popular posts from this blog

' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
भाग-2  ' सामाजिक उद्योजकता लोककला आणि कलापथक' समाजामध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी कलापथक यांचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.ते पारंपरिक कला सादर करतात ज्यातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन होते. आजच्या घडीला सोशल मीडियाच्या वापराने त्याच्या एवढा प्रभाव कोणत्याच माध्यमाचा नाही. बुरसटलेली विचारसरणी, परंपरागत रुढी यांचा  प्रभाव, नवीन विज्ञानवादी गोष्टींचा विचार करण्याची अपरिहार्यता या सर्व गोष्टी पारंपारिक कला पथक प्रभावी पद्धतीने  सादर करण्याचे काम करत आहे. आज भारतात  संडासांची संख्यापेक्षा मोबाईलची  संख्या जास्त आहे.म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेपेक्षा तांत्रिक गोष्टींचा वापराला जास्त महत्त्व आहे.म्हणूनच या मोबाईलच्या माध्यमातून इतर पश्चिमात्य गोष्टींचा अगदी सहजतेने प्रवेश होत आहे ज्याच्यामुळे आमचा मेंदुसुद्धा  काम करणं बंद झाला आहे. दिसली मोकळी जागा की मुतणार तिथे, थुंकनार तिथे,कचरा पण टाकणार तिथे...मग राहत ते काय? आणि याच गोष्टीमुळे आज  हागण्या-मुतण्यावर ,कचरा ,आणि स्वच्छतेवर या लोकांना प्रबोधन करण्याची वेळ येत आहे. नविन मूल्यांची उपयोगित...
पोटाची भूक भागवायला निघालेलं हे दुकान,आणि जिभेसाठीच माझा हट्ट,आणि त्यासाठीची प्रतीक्षा।पिढ्यानपिढ्या चालेलला हा भावनेचा भार।आजोबा आणि,नातू,जीवन पट दर्शवते आज। सामोरंच अदृष्य दृश्य पण नवीन पिढीला  देताय जून्या कलेचे शिक्षण।निरीक्षणाचा खेळ हा...घेत आहे धडे,समोर येणाऱ्या प्रश्नाचे।अवगत होत आहेंत नवीन कला,त्या पिढ्यानपिढ्या येणाऱ्या घटकास।बदलेल ही पिढी पण हट्ट मात्र असनार त्या जिभेच्या  चविचा।