Skip to main content
भाग-2
 ' सामाजिक उद्योजकता लोककला आणि कलापथक'

समाजामध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी कलापथक यांचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.ते पारंपरिक कला सादर करतात ज्यातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन होते. आजच्या घडीला सोशल मीडियाच्या वापराने त्याच्या एवढा प्रभाव कोणत्याच माध्यमाचा नाही. बुरसटलेली विचारसरणी, परंपरागत रुढी यांचा  प्रभाव, नवीन विज्ञानवादी गोष्टींचा विचार करण्याची अपरिहार्यता या सर्व गोष्टी पारंपारिक कला पथक प्रभावी पद्धतीने  सादर करण्याचे काम करत आहे.
आज भारतात  संडासांची संख्यापेक्षा मोबाईलची  संख्या जास्त आहे.म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेपेक्षा तांत्रिक गोष्टींचा वापराला जास्त महत्त्व आहे.म्हणूनच या मोबाईलच्या माध्यमातून इतर पश्चिमात्य गोष्टींचा अगदी सहजतेने प्रवेश होत आहे ज्याच्यामुळे आमचा मेंदुसुद्धा  काम करणं बंद झाला आहे. दिसली मोकळी जागा की मुतणार तिथे, थुंकनार तिथे,कचरा पण टाकणार तिथे...मग राहत ते काय?
आणि याच गोष्टीमुळे आज  हागण्या-मुतण्यावर ,कचरा ,आणि स्वच्छतेवर या लोकांना प्रबोधन करण्याची वेळ येत आहे.
नविन मूल्यांची उपयोगिता,सृजनशीलता , विज्ञानवादी दृष्टिकोन पसरवण्यातून लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे काम करतात . सामाजिक   उद्योजकतेच्या चौकटीमध्ये अगदी तंतोतंत बसणारी , ही कलापथके आहेत. महाराष्ट्राचा पारंपारिक लोकाकलेत तमाशा मधील  'वगा' द्वारे  वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर भाष्य केलं जातं. 'भारुड' हा प्रकार देखील सामाजिक वैचारिकता प्रगल्भ करतो. दिवाळीच्या दिवसांमध्ये पहाटेच गाणी म्हणत गावांमधून फिरणारा वासुदेव हा अध्यात्मिक,  सामाजिक गीतांमधून प्रबोधन करत असतो.आणि जो व्यक्ती ती गाणी ऐकतो साहजिकच त्यावर विचार करत राहतो.
पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव जसजसा वाढत गेला तसतशी भारतीय संस्कृतीची लक्तरे वेशीवर टांगली गेली.लोककलांचा वारसा लुप्त होत चालला. लोककला माध्यमातून समाज प्रबोधन कमी झालं.  लोककलांमध्ये पश्चिमात्य पद्धतीचा शिरकाव झाला आणि सगळंच रिमिक्स व्हायला लागल. काळानुसार बदल करणे योग्यच आहे परंतु तो बदल त्या विषयीच्या संस्कृतीच्या नितीमुल्ल्यांमध्ये  बदल करणारा नसावा .लोककलांचा विकास करून स्वतःचे पोट भरणारा आणि स्वतःची आर्थिक गणिते सांभाळणारा एक वर्ग अस्तित्वात आहे याच भान ठेवावं.पारंपरिक कर्यशैलीत बदल करून काळानुरूप आपल्या सामाजिक उद्योजक मध्ये बदल करून मूलभूत तत्त्वांची पायमल्ली न करता या कलापथकांनी कार्य करावे.केवळ इलेक्शन अथवा सरकारी निमसरकारी कार्यालयासाठी काम न करता शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण आणि जागरूकता निर्माण होण्यासाठी या कलापथकांनी काम करणं महत्त्वाचं ठरेल.
' राष्ट्रीय ग्राम विकास संस्था आणि पंचायत राज' हैदराबाद मध्ये आज पाणी, स्वच्छता ,आरोग्य व्यवस्थापन या विषयावर समाज प्रबोधन करणाऱ्या ग्रुपला/ कलापथकला ऐकायला मिळालं. समाजप्रबोधन तेलुगु भाषेमधून असलं तरी चेहऱ्यावरील अविर्भाव आणि जोश यामधून जो संदेश द्यायचा होता तो त्यांनी अगदी सहजरीत्या दिला. आम्ही सर्वांनी देखील अगदी लीलया तो समजावून घेतला.यासाठी आम्हाला ती भाषा येण्याची गरजदेखील भासली नाही.
कलापथकांमधून  दिला जाणारा प्रत्येक संदेश हा समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या भल्यासाठीच आहे.आज आपल्या प्रत्येकाचीच या कलापथकांना  जपण्याची आणि त्यांना समृद्ध करण्याची भूमिका असायला हवीय आणि मला खात्री आहे ती राहील.एक सामाजिक उद्योजकतेचे नवीन स्वरूप म्हणून भविष्यात ते पूर्ण नावारूपास येतील ही सदिच्छा!
-अतुल संगीता आत्माराम.
9527544478

Comments

Popular posts from this blog

' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
पोटाची भूक भागवायला निघालेलं हे दुकान,आणि जिभेसाठीच माझा हट्ट,आणि त्यासाठीची प्रतीक्षा।पिढ्यानपिढ्या चालेलला हा भावनेचा भार।आजोबा आणि,नातू,जीवन पट दर्शवते आज। सामोरंच अदृष्य दृश्य पण नवीन पिढीला  देताय जून्या कलेचे शिक्षण।निरीक्षणाचा खेळ हा...घेत आहे धडे,समोर येणाऱ्या प्रश्नाचे।अवगत होत आहेंत नवीन कला,त्या पिढ्यानपिढ्या येणाऱ्या घटकास।बदलेल ही पिढी पण हट्ट मात्र असनार त्या जिभेच्या  चविचा।