' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात जागतिक स्पर्धेला दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
Very Good
ReplyDelete