Skip to main content
Field Diary':
कथा परिवर्तनाची:
'आदर्शगाव राजगड'
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुल तालुक्यापासून  २५ किमी अंतरावर असलेलं राजगड हे गाव.गावाला प्राचीन काळापासूनच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.राजगड म्हणजे गेडाम राजाची भूमी.आजही त्या राजवटीच्या अस्तित्वाच्या खुणा पाहायला मिळतात.चंद्रपूर चे आत्राम राजे आणि  राजगड चे गेडाम राजे हे दोन राजघराणे. चंद्रपूर च राजा शक्तीने बलशाली असल्याने त्याने काही काळातच राजगडच्या गेडाम राजाचा पराभव केला.
गावामध्ये  मामा तलावात असणारे हेमाडपंथी मंदिर गावाच्या ऐतिहासिक वैभवात अजुनच शोभा आणते.
सौ.हजारे या इथल्या सध्याच्या सरपंच.गावाच्या इतिहासात एकदा अपवाद वगळता २००० सालापासून  बिनविरोध निवडणूक होत आहे.२००२ २००३  मध्ये गावाला  स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्याच निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला.त्यानंतर पुन्हा २०१६मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला.ग्रामपंचायत मध्ये ग्रामसांसद हॉल मध्ये  आतापर्यंत मिळालेलं सगळे पुरस्कार ठेवून आहेत.ते गावाच्या अभिमान वाढवतातच.आता आपण बोलुयात स्वच्छतेविषयी.गावामध्ये मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायत पर्यंत पोचण्यासाठी साधारण १.५ ते २ किमीच्या रस्त्यामध्ये दुतर्फा झाडे आहेत आणि कागदच एक तुकडासुध्दा नजरेस पडणार नाही.जागोजागी सार्वजनिक कचराकुंडी बसविल्या आहेत. सांडपाण्याची व्यवस्था अगदी उत्तम रित्या केलेली आहे.गावामध्ये तंबाखू,गुटखा,सुपारी आणि दारू बंदी आहे.गावामध्ये बचत गटाच्या महिलांकडून,युवक मंडळांकडून आणि शेतकऱ्याकडून नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम चालू राहतात.गावाची १००% कर वसुली आहे.
कचरा व्यवस्थापनासाठी आदर्श घ्यावं असे हे आदर्श राजगड. गावातील प्रत्येक कुटुंबं हे आपला घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवत पर्यायानं संपूर्ण गाव स्वच्छ राहत हा अगदी साधा सोपा नियम.इतक्या साध्या आणि सोप्या नियमावर संपूर्ण गाव स्वच्छतेचे आदर्श उदाहरण बनले आहे.घरगुती स्तरावर कचरा व्यवस्थापनाचा कोणताच प्रश्न नाही. सार्वजनिक स्तरावर कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत ने जागोजागी कचराकुंड्या बसविल्या आहेत.तसेच घंटागाडीतून कचरा गोळा करून तो ग्रामपंचायतच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये नेला जातो.तिथे प्लास्टिक,धातू,कागदी/कापडी अशा पद्धतीने त्याचे वर्गीकरण केले जाते.त्याचं प्रकल्पामध्ये गांडूळ खत आणि कंपोस्ट खताचा प्रकल्प आहे.गावातील जमा होणाऱ्या कचऱ्यावर व्यवस्थापन करून त्यापासून गांडूळ खत,कंपोस्ट खत बनविले जाते.जी जागा काही वर्षांपूर्वी अस्वच्छतेचे भरलेली होती ती जागा आता ऑक्सिजन पार्कमध्ये /शोभिवंत बगीच्यामध्ये रूपांतरित झालेली आहे .एकंदरीतच प्रत्येक गावाने आणि जे कोणी कचरा व्यवस्थापनावर कार्य करत आहेत संशोधन करत आहेत त्यांनी एकदा तरी  या गावाला भेट द्यावी.
(विशेष सहकार्य: रोशन आलम,संगणक परिचालक,ग्रामपंचायत राजगड ,तालुका-मुल, जिल्हा-चंद्रपूर.
प्रेम कासदेकर,रवी अहिरे मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक)
- अतुल संगीता आत्माराम
9527544478


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’ PC:www.wildfilmindia.com (देशाचे  मा.पंतप्रधान स्वच्छतेवर खूपच आक्रमक असून नेहमीच त्याबाबत कोणत्या न कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात व्यस्त असतात.हा लेख लिहिण्याचं प्रयत्न मा.पंतप्रधान आणि त्यांच्या स्वच्छताविषयक योजना आणि विचारांनी प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने ‘स्वच्छता दूत’ असणाऱ्या माझ्या साऱ्या भारतातील माता भगिनींना समर्पित. #’स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’# मी सायंकाळी  गॅलरीमध्ये चहा पीत  उभा होतो आणि माझी नजर गलरीमधून सायंकाळच्या होणाऱ्या हालचाली टिपण्यात व्यस्त होती.समोरील एका घरासमोर एक मुलगी अंगण झाडत होती.आणि समोरच्या नालीवर काही तळीराम चार्जिंग होऊन बसले होते.मी मात्र ते दृश्य पाहून स्वच्छतेच्या विचारात व्यस्त झालो. बसलेल्या तळीराम फालतू गोष्टी करण्यासोबतच त्या मुलीकडे पाहून एकमेकांना खुणावत होते.ती मुलगी हाताने झाडू घेऊन झाडत होती आणि दुसऱ्या हाताने आपली इज्जत वर तळीरामच्या नजरेतून वाचवण्यासाठी संघर्ष करत होती.बाजूच्याच दुकानात टीव्हीवर नुकताच मा.देशाच्या पंतप्रधान कडून झालेल्या ‘मन की बात’ वर चर्चा चालू होती.मा....

घनकचरा व्यवस्थापनाचा सुप्त किडा

 टाटा इन्स्टिट्यूट मधून पाणी,स्वछता आणि आरोग्य व्यवस्थापन विषयात पदवी घेऊन  मी युनिसेफ संस्थेसाठी काम करत आहे.जेव्हापासून मी WASH कोर्सला प्रवेश घेतलंय, तेव्हापासून जिथं कुठं  मला घनकचरा दिसतोय-तेव्हा माझ्यातील सुप्त किडा मला नेहमीच आव्हान करत होता. "अरे अतुल,एवढा तुझ्यासमोर कचरा दिसतोय आणि तू काहीच करत नाहीयेस ?" असं बोलल्याप्रमाणे तो मला जणू शह देत होता. माझ्यासह अखिल मानवजात त्यांच्या दैनंदिन जीवनात कोट्यवधी किलोचा कचरा निर्माण करून पृथ्वीवर साठवत आहे.आणि फार कमी लोक त्याच्या व्यवस्थापणासाठी काम करत आहेत.  मी यवतमाळ येथील उमरी गावातील एका संस्थेत मागच्या एक आठवड्यापासून मुक्कामी आहे.येण्याचं प्रयोजन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. अभियांत्रिकी आणि सामाजिक विज्ञान शास्त्रातील माझ्या पदवीचा उपयोग या ठिकाणी पुरेपूर करून शिक्षण,पोषण आणि पर्यावरण विषयात दखलपात्र काम करता येऊ शकतं का ? याचाच मला अनुभव घ्यायचं आहे. इथे खचाखच भरून असणारा कचरा मला जास्तच अनुभव देत आहे.अगदी निर्जीव गोष्टीदेखील तुम्हाला शिकवत असतात त्याप्रमाणे!  येणाऱ्या काही दिवसांत यावर काय काय फलनिष्पत्ती ...