Skip to main content
'सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजक '
'


Uncommon Social Entrepreneur_'


 ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे उद्योजकता असू शकते याविषयीचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. ज्याला आपण आजच्या युगामध्ये 'जुगाड तंत्रज्ञान' संबोधतो त्याचा उदय हा ग्रामीण भागात होत असतो.लोकांच्या सुप्त डोक्यातून कल्पना या अशाच उगम पावत आहेत गावागावातून. वास्तविक पाहता ग्रामीण भागातील ही कला जर जतन केली  व त्याला चांगल्या पद्धतीने तज्ञांचे मार्गदर्शन घेतलं आणि विपणन साखळी उपलब्ध करून दिली तर आजच्या काळात करोडोंचा व्यवसाय करणारे व्यवसायांच्या यादीत ही जुगाड तंत्रज्ञाने बसतील. चला तर पाहुयात असच एक जुगाड तंत्रज्ञान.
सामाजिक उद्योजक म्हणून हा अवलिया नक्कीच सार्थ ठरतोय .आजच्या काळातील ह्या सामाजिक उद्योजक, उद्योजकता, तंत्रज्ञ, तंत्रज्ञान यासारख्या अवघड वाटणाऱ्या संकल्पना ज्या  आहेत तो हा अवलिया प्रत्येक दिवशी जगतो. पण त्याला माहीतच नाही की आजच्या बदलणाऱ्या  आणि स्पर्धेच्या युगात याला सामाजिक उद्योजकता आणि स्वतःला सामाजिक उद्योजक म्हणतात. तसं पाहिलं तर हा जो व्यवसाय आहे तो त्यांचा पिढीजात व्यवसाय. भारताच्या इतिहासातील मागास आणि अस्थिर,भटकी  जमात म्हणून कदाचित लोकांनी यांना भरपूर विशेषणे लावली असतील. स्वच्छता ,कचरा व्यवस्थापनात आज भारताने कितीतरी योजना अमलात आणल्या ,कितीतरी लोकांना स्वच्छता दुत म्हणून पुरस्कार मिळाला परंतु खरंच स्वच्छता दूत हा पुरस्कार अशाच व्यक्तींना मिळायला हवं. कचरा समजल्या जाणाऱ्या वस्तूंवर प्रक्रिया करून आर्थिक गुजराण करणारा हे कुटुंब नवरा बायको मुलगा आणि पुतण्या असे चौघे जण हा व्यवसाय करताना मी पाहिले .सरकारी दस्तऐवज मध्ये भटकी जमात म्हणून यांची नोंद आहे. आजच्या घडीला या व्यवसायाला कोणत्या कॅटेगरीमध्ये ठेवायचे आणि त्यांच्या व्यवसायाला काय नाव द्यायचे हा माझ्यासमोरल प्रश्न अनुत्तरितच आहे. जुन्या साड्यांवर  प्रक्रिया करणं  आणि त्यातून कलात्मक वस्तूंची निर्मिती करणे हा त्यांच्या व्यवसायाचा मूलभूत गाभा. साधारण पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे त्यांच्याजवळील मानवी शक्तीने चालणारे मशीन एवढीच  ती काय यांची गुंतवणूक आणि या गुंतवणुकीवर ते लाखो रुपयांचा व्यवसाय करू शकत आहेत.एक जुनी साडी घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्यापासून दोरखंड बनवून देणे हा व्यवसाय ते करतात.प्रत्येक दिवशी नवीन गाव,नवीन लोक अस त्यांचं जीवन. ते जिथे जात होते तेथेच सोबतच त्यांच्या सोबत असणारे ते लहानसे अवजार घेऊन जात.त्यांना गावात जाताच कोणत्याच मार्केटिंग ची गरज नाही.त्यांना पाहताच माऊथ पब्लिसिटी ने संपूर्ण गावात ते आल्याची खबर अगदी काही मिनिटात पोचते. गावातील महिला त्यांच्या घरी असणाऱ्या जुन्या साडी घेऊन येत .जुन्या साड्या फाडून त्यापासून साधारण 20 फूट लांबीचा दोरखंड ते बनवून देत होते .त्यासाठी प्रति साडीला वीस रुपये ते मजुरी म्हणून घेत होते.एका साडी पासून साधारण २०फूट लांब दोरी बनते. मी साधारण २५ -३० मिनिटे तिथे होतो. तेवढ्या कालावधीमध्ये जवळजवळ तीस साड्यांवर प्रक्रिया करून  त्यांनी ६०० रुपये कमावले. कुठलीही मार्केटिंगची साधने उपलब्ध नाही ,कुठलाही प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नाही, तरीदेखील ते कुटुंब प्रति दिवशी २००० रुपये कमवत असावेत असा माझा अंदाज.एवढे असून देखील त्यांच्याकडे पाहून त्यांच्या भटक्या जमातीत आजच्या प्रगत 'स्टार्ट अपचा'   मागमूस लागेना. हाच व्यवसाय शहरी भागामध्ये असता तर यावर कित्येकांनी कोटीत पैसे कमावले असते.एक इंजिनियर म्हणून आणि सामाजिक उद्योजक म्हणून त्यांचा व्यवसाय आणि तंत्रज्ञान पिढीजात पुढे चालवण्याचा आणि तशाच पद्धतीच्या व्यवसायातून किमान ५-६ लोकांना तरी रोजगार उपलब्ध करून देण्याचा मी मनोमन निश्चय करून तिथून पुढच्या गावी निघालो.
अतुल-9527544478

Comments

Popular posts from this blog

' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’ PC:www.wildfilmindia.com (देशाचे  मा.पंतप्रधान स्वच्छतेवर खूपच आक्रमक असून नेहमीच त्याबाबत कोणत्या न कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात व्यस्त असतात.हा लेख लिहिण्याचं प्रयत्न मा.पंतप्रधान आणि त्यांच्या स्वच्छताविषयक योजना आणि विचारांनी प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने ‘स्वच्छता दूत’ असणाऱ्या माझ्या साऱ्या भारतातील माता भगिनींना समर्पित. #’स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’# मी सायंकाळी  गॅलरीमध्ये चहा पीत  उभा होतो आणि माझी नजर गलरीमधून सायंकाळच्या होणाऱ्या हालचाली टिपण्यात व्यस्त होती.समोरील एका घरासमोर एक मुलगी अंगण झाडत होती.आणि समोरच्या नालीवर काही तळीराम चार्जिंग होऊन बसले होते.मी मात्र ते दृश्य पाहून स्वच्छतेच्या विचारात व्यस्त झालो. बसलेल्या तळीराम फालतू गोष्टी करण्यासोबतच त्या मुलीकडे पाहून एकमेकांना खुणावत होते.ती मुलगी हाताने झाडू घेऊन झाडत होती आणि दुसऱ्या हाताने आपली इज्जत वर तळीरामच्या नजरेतून वाचवण्यासाठी संघर्ष करत होती.बाजूच्याच दुकानात टीव्हीवर नुकताच मा.देशाच्या पंतप्रधान कडून झालेल्या ‘मन की बात’ वर चर्चा चालू होती.मा....

घनकचरा व्यवस्थापनाचा सुप्त किडा

 टाटा इन्स्टिट्यूट मधून पाणी,स्वछता आणि आरोग्य व्यवस्थापन विषयात पदवी घेऊन  मी युनिसेफ संस्थेसाठी काम करत आहे.जेव्हापासून मी WASH कोर्सला प्रवेश घेतलंय, तेव्हापासून जिथं कुठं  मला घनकचरा दिसतोय-तेव्हा माझ्यातील सुप्त किडा मला नेहमीच आव्हान करत होता. "अरे अतुल,एवढा तुझ्यासमोर कचरा दिसतोय आणि तू काहीच करत नाहीयेस ?" असं बोलल्याप्रमाणे तो मला जणू शह देत होता. माझ्यासह अखिल मानवजात त्यांच्या दैनंदिन जीवनात कोट्यवधी किलोचा कचरा निर्माण करून पृथ्वीवर साठवत आहे.आणि फार कमी लोक त्याच्या व्यवस्थापणासाठी काम करत आहेत.  मी यवतमाळ येथील उमरी गावातील एका संस्थेत मागच्या एक आठवड्यापासून मुक्कामी आहे.येण्याचं प्रयोजन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. अभियांत्रिकी आणि सामाजिक विज्ञान शास्त्रातील माझ्या पदवीचा उपयोग या ठिकाणी पुरेपूर करून शिक्षण,पोषण आणि पर्यावरण विषयात दखलपात्र काम करता येऊ शकतं का ? याचाच मला अनुभव घ्यायचं आहे. इथे खचाखच भरून असणारा कचरा मला जास्तच अनुभव देत आहे.अगदी निर्जीव गोष्टीदेखील तुम्हाला शिकवत असतात त्याप्रमाणे!  येणाऱ्या काही दिवसांत यावर काय काय फलनिष्पत्ती ...