Skip to main content
 शोध  सामाजिक उद्योजकतेचा.".
माझ्या वैयक्तिक भेटीतून आणि क्षेत्र अनुभवातून मी पाहिलेल्या 15  असामान्य सामाजिक उद्योजक आणि त्याच्या उद्योगांची शृंखला लिहण्यासाठी सुरुवात करत आहे.हे सर्व उद्योजक आपल्या प्रत्येकाच्याच पाहण्याचे आहेत.परंतु
त्यांच्याप्रती असलेला सामाजिक दृष्टिकोन बदलून त्यांच्याकडे एक माणूस आणि उद्योजक म्हणून पाहून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे अथवा त्यासाठी प्रयत्न करणे हाच या शृंखलेचा उद्देश!

भाग -1: ' मी मूर्तिकार
'असामान्य सामाजिक उद्योजक '

मी अशा व्यक्तीविषयी बोलत आहे जे आपल्या समाजात  'सामाजिक उद्योजक' म्हणून काम करतात आणि त्यांचं काम आहे कचरा व्यवस्थापनाच. तुम्ही आम्ही लोक  दारू पिऊन  ज्या बाटल्या टाकतो  ना त्याची टोपण कुजली जात नाहीत. त्याच टोपणांवर प्रक्रिया करून त्यापासून अप्रतिम आणि सुबक मूर्ती बनविण्याचे काम हा अवलिया करतो. आणि आपल्यासारखे लोक आपल्याच कचऱ्याची त्याच्याकडे असलेल्या जुगाड  टेक्नॉलॉजी  द्वारे सुबक मूर्ती बनवून घेतात.
बुरसटलेले सामाजिक विचारसरणी,कचऱ्याच्या किमतीपेक्षा समाजामध्ये मिळणारी कमी  किंमत हेच ते काय अशा सामाजिक उद्योजकांचे अस्तित्व.
त्याच्या सामाजिक उद्योजकतेचे धडे आयआयएम (IIM) सारख्या विद्यापीठात गिरवले तरी त्या तत्वांची आपल्या विद्यार्थ्यांना सर येणार नाही.असे व्यवसाय जर  शहरी व्यक्तीने शहरी भागात केले तर  त्याला पैसे, मान,इज्जत सगळच मिळेल.खूप सारे पुरस्कार देखील मिळतील.पण अशा उद्योजकांना काय मिळेल?

मी पाहिलेले हेच खरे बेस्ट  'वेस्ट मॅनेजर ' आहेत. कदाचित त्यांना वेस्ट मॅनेजर या व्यक्तीचं काम काय असतं हे सुद्धा माहीत नसेल परंतु त्यांना त्या पदापेक्षा  जास्त स्वच्छाग्रहीच काम हे लोक करत आहेत. आपल्याच समाजाने यांना अतिशय हिनतेची वागणूक देऊन कालबाह्य केलंय. यांचे अस्तित्व ते काय आहे हो आपल्या समाजामध्ये? विकासाच्या नावाखाली कचरा आपण करायचा; चैनीच्या हौस मौजेसाठी दारू दारू पिऊन बाटल्या आपण मोकळे करायचा आणि त्याच बाटल्या यांनी गोळा करायच्या. आणि पुन्हा अस्वच्छतेच्या नावाखाली बोंबा मारायचा!  स्वच्छ भारत अभियानाच्या नावानं मोठमोठ्या योजना राबवून स्वच्छाग्रही म्हणून कित्येकांना पुरस्कार दिले. पण अशा लोकांपैकी एकाला पण मिळाले नाही. मला वाटते हेच खरे स्वच्छतादूत आहेत  आणि यांना काय मिळाले? यांना मिळाला जातीयवादी द्वेष, समाजबाह्य जगणं, उपासमार,गरिबी आणि अत्युच्च हीनतेची वागणूक!
स्वच्छ भारतासाठी  स्टार्ट अप इंडिया सारख्या कित्येक योजना  आणि आणि स्वच्छ तेच्या कित्येक स्टार्ट अप ने बक्षिसे जिंकली लाखोंची,पण यांच्या स्टार्ट अपला काय मिळाले हो..यांच्याकडून यांच्या कष्टाच्या पैशात पण सामान्यांनी आणि पैसेवाल्यांनी  चेंगु पणा दाखवत पैसे कमी करायचे.मी असे नाही पाहिलं  की कोणी व्यक्तीने त्या व्यक्तीला जास्त पैसे दिले अगदी मी सुध्दा.

आता येऊयात मुख्य उद्योजकतेच्या  विषयावर.
व्यवसायावर बोलायचं झाल्यास हा असा व्यवसाय आहे ज्याला आपण टाकाऊ गोष्टींपासून मूर्तीकाम म्हणू शकतो. मी पूर्वी लिहिलेल्या काही ब्लॉग पैकी हा पुन्हा असा  ब्लॉग आहे की या व्यवसायच नाव आणि कॅटागरी काय ते ठरवता येत नाही.हा व्यक्ती दारूच्या बाटल्यांचा टोपनांपासून (साधारण ६०-७०) त्यांना सुबक मूर्ती बनवतो.ती टोपणे तिथेच बनवलेल्या भट्टीमध्ये  (इथेपण जूगाड) टाकून ती वितळवतो. वितळलेले ते मिश्रण साच्यामध्ये टाकून एकावेळी २ ते ३ मूर्ती बनवतो.या सर्व प्रक्रियेला साधारण १५ ते २० मिनिटे लागतात . १५ ते २० मिनिटांच्या वेळात या व्यक्तीने साधारण १५० रुपये कमावले.ही सुध्दा भटकी जमात असून ते गावोगावी फिरून आपली गुजराण करतात.एका दिवसाच गणित जुळवल तर ३००रुपयांची त्यांची दिवसाची कमाई धरली तरी त्यांच  महिन्याकाठी जगण्याचा संघर्षाचं असतो.

आज यांच्या अस्तित्वामुळे कचरा व्यवस्थापन खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने होत आहे.मी तर या लोकांसाठी माझा लहान का होईना प्रयत्न करणार आहेच.शक्य असेल तर तुम्ही सुध्दा करा.
- अतुल संगीता आत्माराम
9527544478


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
भाग-2  ' सामाजिक उद्योजकता लोककला आणि कलापथक' समाजामध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी कलापथक यांचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.ते पारंपरिक कला सादर करतात ज्यातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन होते. आजच्या घडीला सोशल मीडियाच्या वापराने त्याच्या एवढा प्रभाव कोणत्याच माध्यमाचा नाही. बुरसटलेली विचारसरणी, परंपरागत रुढी यांचा  प्रभाव, नवीन विज्ञानवादी गोष्टींचा विचार करण्याची अपरिहार्यता या सर्व गोष्टी पारंपारिक कला पथक प्रभावी पद्धतीने  सादर करण्याचे काम करत आहे. आज भारतात  संडासांची संख्यापेक्षा मोबाईलची  संख्या जास्त आहे.म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेपेक्षा तांत्रिक गोष्टींचा वापराला जास्त महत्त्व आहे.म्हणूनच या मोबाईलच्या माध्यमातून इतर पश्चिमात्य गोष्टींचा अगदी सहजतेने प्रवेश होत आहे ज्याच्यामुळे आमचा मेंदुसुद्धा  काम करणं बंद झाला आहे. दिसली मोकळी जागा की मुतणार तिथे, थुंकनार तिथे,कचरा पण टाकणार तिथे...मग राहत ते काय? आणि याच गोष्टीमुळे आज  हागण्या-मुतण्यावर ,कचरा ,आणि स्वच्छतेवर या लोकांना प्रबोधन करण्याची वेळ येत आहे. नविन मूल्यांची उपयोगित...
पोटाची भूक भागवायला निघालेलं हे दुकान,आणि जिभेसाठीच माझा हट्ट,आणि त्यासाठीची प्रतीक्षा।पिढ्यानपिढ्या चालेलला हा भावनेचा भार।आजोबा आणि,नातू,जीवन पट दर्शवते आज। सामोरंच अदृष्य दृश्य पण नवीन पिढीला  देताय जून्या कलेचे शिक्षण।निरीक्षणाचा खेळ हा...घेत आहे धडे,समोर येणाऱ्या प्रश्नाचे।अवगत होत आहेंत नवीन कला,त्या पिढ्यानपिढ्या येणाऱ्या घटकास।बदलेल ही पिढी पण हट्ट मात्र असनार त्या जिभेच्या  चविचा।