Skip to main content
बहीण म्हणाली मला,चल न दादा फिरायला,
किती दिवस झालं ,बाहेर जायला.
म्हणाली मग ती मला काय रे दादा,तुझी पाखरू कसली भारी हसली आज?
करून येईल  का कधी ती तुझ्यासाठी साज?

तुला ती दिसली आणि  पाहून हसली , तेव्हापन तुझ्या चेहऱ्यावरची चमक मला दिसली.
अरे दादा,नको करू लेट,
तू थेट जाऊनच भेट, 
तिने सांगितलंय मला तिच्या मनाचा 1 कप्पा,
राखून ठेवलाय तुझ्याशी मारायला गप्पा!

बहीण म्हणाली मला, ये दादा,
 उद्या जाणार ती गावी,मग तुला बोलण्यासाठी नको का कोणी,
CC ला तू जाशील आणि जाम बोर होशील,
आणि पुन्हा मलाच तुझ्या विरहाच्या कविता ऐकवशील!

मी सांगते त्यापेक्षा ऐक ना दादा,
तिला सांगून टाक ना तुझ्या मनाचा वादा..
माझ्यापुढे डोंगराएवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो,
आणि ती आली की चॉकोलेट सारखा वितळतोस..

सांगून ठेवते तुला, म्हणायचा नाही परत मला,
तिची आठवण येतेय म्हणून!
 म्हणाली मग मला दादा तुला सांगू का? 
  तू म्हणजे चहा न ती म्हणजे कॉफी,
तू म्हणजे ऊन, ती म्हणजे सावली,
 तू म्हणजे दिवस ,ती म्हणजे रात्र,
तुमच्या दोघांचं अस्तित्व आहे हे सत्य,
तुम्हाला न बोलायला पाहिजे फक्त निमित्त...
नजरेनं बोलता नि हसून लाजता,
मना-मनातून तुम्ही किती भांडता..

मग म्हणालो मी बहिणीला,
तूच माझी मुक्ताई,
मी तुझा ज्ञानदेव, 
सांगणार तर मी तुला ,तिची आठवण येतेय मला,
CC ला जाणार पण बोर नाही होणार,

तू म्हणजे टाळ, आणि  मी म्हणजे मृदंग,
तुझ्यासंगे गाईन मी 
विठू-माऊलीचे अभंग!

अजून मी म्हटलं माझ्या बहिणीला, 
प्रेम म्हणजे काय प्रेमींचच असतं...?
आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा कमीच ते असता...
धन्य ती मुक्ताई आणि धन्य तो  ज्ञानोबा!
त्यांचं बंधुप्रेम उभ्या देहांनी पाहिल!.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या ...

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे