Skip to main content
"पुन्हा एकदा मासिक पाळीवर बोलू काही-सुसंवाद दोघांशी"
समाजामध्ये आज कचऱ्याची  जी व्याख्या आहे तीच व्याख्या 'मासिक पाळी व्यवस्थापन ' विषयी आहे.
कचऱ्याला कचरा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात झाली तसेच मासिक पाळी या विषयवार बोलणं सुरुवात झालं हेच महत्वाचं.येणाऱ्या काळात महिलांच्या आरोग्याविषयी आणि पर्यायाने सामाजिक आरोग्याविषयी यामध्ये मानसिक ,शारीरिक आरोग्य आलेच हा! समाजामध्ये या बाबतीत सकारात्मक बदल घडूनच येत राहावं हीच अपेक्षा.
साधारण दीड वर्षापूर्वी विदर्भात एका गावात मी समाजकार्य महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या साहाय्याने एक सर्वेक्षण केलं होत, ज्यात अस आढळून  आला होत की गावामधील ८०% महिला जे मासिक पाळीदरम्यान कापडाच वापर करतात ते धुवून सावलीत  आणि अंधाऱ्या जागी वाळण्याला घालतात जे की पूर्णपणे आरोग्यास अपायकारक आहे.तसेच या बाबतीत म्हणावी तशी जागरूकता नाही आहे.
दुसरा सर्वेक्षण मी मागील महिन्यात केलं ते हे की मुलींमध्ये  सनिटरी नॅपकिन वापरण्याविषयी जाणीव जागृती आहे परंतु त्याच सुरक्षित विल्हेवाट व व्यवस्थापन करणे  याबाबत जाणीव जागरूकता म्हणावी तशी नाहीय.
एक महिला ,मुलगी म्हणून  याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि एक पुरुष म्हणून याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातच खूप मोठी तफावत आहे.लैंगिक शिक्षणाच अभाव,त्या शिक्षणाबाबत   सर्वच स्तरातील अनास्था,पुरुषांचे महिलांच्या आरोग्याबद्दलच्या समस्यांचे गैरसमजूत आणि महिलेकडे केवळ भोगाची वस्तू बघण्याचा दृष्टिकोन याच गोष्टी आजपर्यंत मासिक पाळी व्यवस्थापनात कमी पडत आल्या होत्या.पुरुष आणि स्त्री या दोघांची परस्परांविषयी सहकार्याची भूमिका अपेक्षित   आहे. गेल्या काही वर्षात यात समाधानकारक बदल घडून येत असून मासिक पाळी व्यवस्थापन यासारख्या विष यावर जाहीररीत्या बोलले जात आहे,जाणीवजागृती उपक्रम विविध कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.याच  अपेक्षित परिणाम असा होत आहे की महिलांचा त्यांच्या जीवनातील तसेच समाजातील स्थान प्रभावीपणे अधोरेखित होत आहे.परिणामी महिला त्यांच्या आरोग्याची आता अधिक जबाबदारीने काळजी घेत आहे.

महिलांनी महिलांच्या मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर काम करण्याचीच काही वर्षांपर्यंत अनास्था होती.श्री. अरूनाचलं मुरुगन सारख्या पुरुषाने महिलांच्या मासिक व्यवस्थापनावर आधारित सामाजिक उद्योजकतेचे मॉडेल उभारलेच आहे.परंतु यासारख्या क्लिष्ट विषयावर काम करताना त्यांना घरातूनच किती संघर्ष करावं लागलं याच किंमत फक्त तेच जाणून घेऊ शकतात.पुरुषांच्या,स्त्रियांच्या  मर्यादा या विषयी काम करताना पावला पावलांवर अधोरेखित होत आहेत.
या महिला सबलीकरणाच्या गप्पा मारणे खूप खूप सोप्प असतय,अवघड असते ते त्यावर काम करणे.आज समाजामध्ये  महिला सबलीकरणाचा बाष्कळ गप्पा मारणारे  आणि स्वतच्या आयुष्यात महिलांचा अनादर करणारे कित्येक नमुने पाहायला मिळतात.पण त्याचबरोबर  अरूनाचालन मुरुगन ,सचिन आशा सुभाष यांच्यासारखे  लोकसुद्धा आहेत जे की महिलांच्या विषयामध्ये 'पुरुष'असून सुध्दा काम करत आहेत आणि एकप्रकारे लैंगिक समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आता या लेखावर 'महिला' या शब्दांवर 'जेंडर' सारख्या विशेषणे घेऊन टीका करणारे आणि भाषणे करणारे खूप आहेत.पण जे मी शिकतो त्याचा खरच फिल्ड वर तशा पद्धतीचा प्रभाव पडून येवू शकतो का  हे  पडताळून पाहणं पण महत्वाचं आहे.मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये आजपर्यंत बऱ्याच संस्था काम करत आहेत. मासिक पाळी यासारख्या क्लिष्ट विषयावरती आज पर्यंत बहुतेकांनी विषय काढताच दुर्लक्ष करण्याचा अथवा त्या विषयावरील पळ काढण्याचा पवित्रा घेतलेला आहे. वास्तविक पाहता हा विषय महिलांच्या पर्यायाने समुदायाच्या दृष्टीने चर्चिला जाण्याचा  आणि शस्वत मार्ग काढण्याचा विषय आहे.एकीकडे महिलांच्या मासिक पाळी व्यवस्थापन जागृती कार्यक्रम करत असतानाच sanitary Pads मुळे होणाऱ्या कचऱ्याचे विल्हेवाट लावणं आणि त्याचा पर्यावरणावरील दुष्परिणामांची शास्त्रज्ञ चिंतित आहेत.एक पुरुष म्हणून महिलांच्या मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये पुरुषांमध्ये जाणीवजागृती करण्याचा प्रयत्न मागील आठवड्यात केला.योग्य शास्त्रीय दृष्टिकोन आणि समजूतदारपणा हाच पुरुषांकडून समुदाय पातळीवर मासिक पाळी व्यवस्थापन करण्यात यशस्वी करण्याच्या गुरुकिल्ली ठरणार आहेत.
या क्लिष्ट विषयात काम करण्यास जी आम्ही सुरुवात केली आहे त्यात योग्य वेळी योग्य बदल करून अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करून सामाजिक आरोग्य सुधारण्याचा नक्कीच छोटा प्रयत्न करू.
-अतुल संगीता आत्माराम
9527544478






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! श...
स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’ PC:www.wildfilmindia.com (देशाचे  मा.पंतप्रधान स्वच्छतेवर खूपच आक्रमक असून नेहमीच त्याबाबत कोणत्या न कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात व्यस्त असतात.हा लेख लिहिण्याचं प्रयत्न मा.पंतप्रधान आणि त्यांच्या स्वच्छताविषयक योजना आणि विचारांनी प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने ‘स्वच्छता दूत’ असणाऱ्या माझ्या साऱ्या भारतातील माता भगिनींना समर्पित. #’स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’# मी सायंकाळी  गॅलरीमध्ये चहा पीत  उभा होतो आणि माझी नजर गलरीमधून सायंकाळच्या होणाऱ्या हालचाली टिपण्यात व्यस्त होती.समोरील एका घरासमोर एक मुलगी अंगण झाडत होती.आणि समोरच्या नालीवर काही तळीराम चार्जिंग होऊन बसले होते.मी मात्र ते दृश्य पाहून स्वच्छतेच्या विचारात व्यस्त झालो. बसलेल्या तळीराम फालतू गोष्टी करण्यासोबतच त्या मुलीकडे पाहून एकमेकांना खुणावत होते.ती मुलगी हाताने झाडू घेऊन झाडत होती आणि दुसऱ्या हाताने आपली इज्जत वर तळीरामच्या नजरेतून वाचवण्यासाठी संघर्ष करत होती.बाजूच्याच दुकानात टीव्हीवर नुकताच मा.देशाच्या पंतप्रधान कडून झालेल्या ‘मन की बात’ वर चर्चा चालू होती.मा....

घनकचरा व्यवस्थापनाचा सुप्त किडा

 टाटा इन्स्टिट्यूट मधून पाणी,स्वछता आणि आरोग्य व्यवस्थापन विषयात पदवी घेऊन  मी युनिसेफ संस्थेसाठी काम करत आहे.जेव्हापासून मी WASH कोर्सला प्रवेश घेतलंय, तेव्हापासून जिथं कुठं  मला घनकचरा दिसतोय-तेव्हा माझ्यातील सुप्त किडा मला नेहमीच आव्हान करत होता. "अरे अतुल,एवढा तुझ्यासमोर कचरा दिसतोय आणि तू काहीच करत नाहीयेस ?" असं बोलल्याप्रमाणे तो मला जणू शह देत होता. माझ्यासह अखिल मानवजात त्यांच्या दैनंदिन जीवनात कोट्यवधी किलोचा कचरा निर्माण करून पृथ्वीवर साठवत आहे.आणि फार कमी लोक त्याच्या व्यवस्थापणासाठी काम करत आहेत.  मी यवतमाळ येथील उमरी गावातील एका संस्थेत मागच्या एक आठवड्यापासून मुक्कामी आहे.येण्याचं प्रयोजन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. अभियांत्रिकी आणि सामाजिक विज्ञान शास्त्रातील माझ्या पदवीचा उपयोग या ठिकाणी पुरेपूर करून शिक्षण,पोषण आणि पर्यावरण विषयात दखलपात्र काम करता येऊ शकतं का ? याचाच मला अनुभव घ्यायचं आहे. इथे खचाखच भरून असणारा कचरा मला जास्तच अनुभव देत आहे.अगदी निर्जीव गोष्टीदेखील तुम्हाला शिकवत असतात त्याप्रमाणे!  येणाऱ्या काही दिवसांत यावर काय काय फलनिष्पत्ती ...