Skip to main content

Posts

Dare to Reduce Big !

  Dare to Reduce Big ! एकीकडे पर्यावरण प्रेमींनी माझी वसुंधरा वाचवण्यासाठी धडपड करायची,प्लास्टिक बंदी मोहीम चालवायची, नगरपालिका, महानगरपालिकांनी कसोशीने प्रयत्न करायचे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हीच प्लास्टिक चा वापर वाढवायचा ! लोकमत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पळणार स्पर्धक, घाण करणार स्पर्धक, प्रेक्षक व आयोजक ! आणि साफ कोणी करायचं, तर  सफाई कर्मचाऱ्यांनी. वाह रे वाह !   थोडं तरी सुधारा ! आमच चांगलं लक्ष आहे ! टीप: स्पर्धेच्या आयोजनात कचरा होणार ,प्लास्टिक चा वापर वाढणार हे माहीत असताना देखील कचरा व्यवस्थापन करण्याचा आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा शहाणपण दाखवावं. मॅरेथॉन मध्ये प्लास्टिक बंदीच्या  आणि कचरा व्यवस्थापनाच्या सूचना दर्शवा, कचऱ्याचे प्रमाण कमी होईल. फोटो मध्ये दाखवलेल्या एका बॉक्स मध्ये 24 बाटल्या आहेत आणि तिथे किमान  60 बॉक्स  ठेवून आहेत. तर   एका कार्यक्रमात  त्या ठिकाणी 1440 प्लास्टिक बाटल्यांचा कचरा निर्माण होणार. आता संपूर्ण मॅरेथॉन मध्ये किती ठिकाणी असे वॉटर स्टेशन असतील त्यावरून गणित करता येईल. P.C.-Vivek Shinde #प्लास्टिकचावापरटाळा #माझा कचरा_माझी जबाबदारी #स्वच्छ_पर्याव
Recent posts

Redefining Education

 Field Diary:1 There are many true COVID-19 Worriers.Nilesh,You are the inspiration for all.Your tremendous efforts for continuing education will bring change in education very soon. #Education_Shouldnt_stop! Atul Sangita Atmaram-9527544478

घनकचरा व्यवस्थापनाचा सुप्त किडा

 टाटा इन्स्टिट्यूट मधून पाणी,स्वछता आणि आरोग्य व्यवस्थापन विषयात पदवी घेऊन  मी युनिसेफ संस्थेसाठी काम करत आहे.जेव्हापासून मी WASH कोर्सला प्रवेश घेतलंय, तेव्हापासून जिथं कुठं  मला घनकचरा दिसतोय-तेव्हा माझ्यातील सुप्त किडा मला नेहमीच आव्हान करत होता. "अरे अतुल,एवढा तुझ्यासमोर कचरा दिसतोय आणि तू काहीच करत नाहीयेस ?" असं बोलल्याप्रमाणे तो मला जणू शह देत होता. माझ्यासह अखिल मानवजात त्यांच्या दैनंदिन जीवनात कोट्यवधी किलोचा कचरा निर्माण करून पृथ्वीवर साठवत आहे.आणि फार कमी लोक त्याच्या व्यवस्थापणासाठी काम करत आहेत.  मी यवतमाळ येथील उमरी गावातील एका संस्थेत मागच्या एक आठवड्यापासून मुक्कामी आहे.येण्याचं प्रयोजन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. अभियांत्रिकी आणि सामाजिक विज्ञान शास्त्रातील माझ्या पदवीचा उपयोग या ठिकाणी पुरेपूर करून शिक्षण,पोषण आणि पर्यावरण विषयात दखलपात्र काम करता येऊ शकतं का ? याचाच मला अनुभव घ्यायचं आहे. इथे खचाखच भरून असणारा कचरा मला जास्तच अनुभव देत आहे.अगदी निर्जीव गोष्टीदेखील तुम्हाला शिकवत असतात त्याप्रमाणे!  येणाऱ्या काही दिवसांत यावर काय काय फलनिष्पत्ती देणार याचा रोख

विदर्भाच्या रानभाज्या

 विदर्भाच्या रानभाज्या - १. टाकळा टाकळा (तरोटा) शास्त्रीय नाव - Cassia tora (कॅसिया टोरा)  कूळ - Caesalpinaceae (सिसालपिनेसी)  टाकळा ही वर्षायू वनस्पती ‘‘सिसाल-पिनेसी’’ म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. या वनस्पतीला काही भागांत ‘तरोटा’ किंवा ‘तरवटा’ अशी स्थानिक नावे आहेत. टाकळा हे तण पडीक ओसाड जमिनीवर, शेतीत, बागांमध्ये, जंगलात, रस्त्यांच्या कडेने सर्वत्र वाढलेले असते. टाकळ्याच्या बिया भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो. टाकळ्याची भाजी: टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर आहे व मलसारक आहे.  पाककृती - कृती १  - फुले येण्यापूर्वीची कोवळी पाने भाजीसाठी वापरावीत.  साहित्य - कोवळी पाने, कांदा, ओली मिरची, तेल, आले, मीठ, ओले खोबरे, हळद

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे

मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण

#मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण: शिक्षणाबाबतची माहिती मिळवून तिचे पालन करणे महत्वाचे का आहे? मुलांच्या वयाची पहिली 8 वर्षे अतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली 3 वर्षे. भावी काळातील आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो. ह्या कालावधीमध्ये मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो. किशोर आणि लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य  संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात.  जन्माची कायदेशीररीत्या नोंदणी होणे, आरोग्य संगोपन, पोषक आहार, शिक्षण, छळ आणि भेदभावापासून संरक्षण मिळणे हे सर्व मुलांचे अधिकार आहेत. ह्या अधिकारांचे आदरपूर्वक पालन, संरक्षण केले जात आहे हे पाहणे पालक आणि शासनाचे कर्तव्य आहे. मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षणाबाबत प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास कोणती माहिती मिळण्याचा हक्क आहे. वयाच्या पहिल्या 8 वर्षांमध्ये घेण्याेत आलेली काळजी व संगोपन, विशेषत: पहिल्या 3 वर्षांतील, अत्यंत महत्वाचे असते आणि त्याच्या किंवा तिच्या  आयुष्यावर ह्याचा प्रभाव पडतो. मुले जन्म घेतल्या क्षणीच शिकू लागतात. त्यांना योग्या आरोग्

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या  यंत्रणावरती खर्च होत आहे. जा