Skip to main content


मी पाहिलेले अवलिया….


एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मेकॉलेने घालून दिलेल्या शिक्षण पद्धतीचे परंपरागत शिक्षण सुरू होते. त्यानंतर शिक्षणाचा प्रसार आणि विस्तार होत गेला.पण जसा काळ बदलला तसं शिक्षण बदलले आणि सध्या बदलांनी प्रचंड वेग घेतला आहे. बालशिक्षणाच्या दिशा स्पष्ट करणारा 2005 चा राष्ट्रीय अधिनियम असो, अथवा 2009 साली आलेला शिक्षण हक्काचा कायदा असो ;त्यातील तरतुदी आणि एकूणच सर्व कायद्यावरून असे स्पष्ट होते की परंपरागत वर्तनवादा कडून ज्ञानरचनावादाकडे संक्रमित होणारा हा शिक्षणाचा काळ आहे.परंपरागत वर्तनवादाकडून ज्ञानरचनावादाकडे नेण्यासाठी सृजनशीलता अथवा नवनिर्मिती हा महत्त्वाचा घटक ठरतो. तुमच्या आमच्यासारखे आपल्या सभोवताली आपले मित्र असतात, परंतु अशी सृजनशीलता किंवा नवनिर्मितीची क्षमता फक्त काहीच व्यक्तीमध्ये असते. अनेकदा सृजनशील व्यक्तिमत्व असं काहीतरी वेगळे करून दाखवतात की ते पाहून आपल्याला खूप भारी वाटतं! आणि ते उदाहरण सगळीकडेच स्वीकाराव असे वाटते. उच्च प्रकारच ज्ञान, बुद्धी आणि स्फूर्ती म्हणजेच प्रतिभा !आणि त्या प्रतिभेतून जी कृती घडते ती सृजनशीलता!
भारताच्या शिक्षण पद्धतीत सरकारी शिक्षण पद्धतीने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे . मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक जडणघडणीमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा आणि शिक्षणामध्ये सरकारी शाळांचा महत्त्वाचा वाटा आहे.परंतु जॉन होल्ट नावाचे एक संशोधक आहेत ते शालेय शिक्षण पद्धतीला विरोध करतात. शिक्षणातील सगळी व्यवस्था, त्यातले सगळी जबरदस्ती, त्यातली स्पर्धा ,त्यातली गाजरं, त्यातल्यात्यात नावडणारा अभ्यासक्रम हे सर्व त्याला धोकादायक आणि दहशतवादी वाटतं,जे की मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक जडण घडणीसाठी परिपूर्ण नाही.याच शिक्षणाविषयी बोलायचं झालं तर कोणीतरी कधी म्हटलेल आहे, ‘शिक्षण’ म्हणजे समजणं; ‘शिक्षण’ म्हणजे स्वतः विचार करणे; ‘शिक्षण’ म्हणजे स्वतःसाठी जीव तुटण; ‘शिक्षण’ म्हणजे कष्ट करू शकण;’ शिक्षण’ म्हणजे चांगला माणूस होणे. ‘शिक्षण’ म्हणजे संकुचितपणा न होणे.हेच जाणून ज्यांनी ‘शिक्षण’ या विषयावर काहीतरी अफलातून प्रयोग केले आणि त्यातून नाविन्यपूर्णतेची उदाहरणे उभी केली अशा त्या काही अनभिज्ञ ,समाजमाध्यमातून दूर असणाऱ्या आणि सामान्यातल्या असामान्य अवलीयांविषयी हा लेख!
राजू केंद्रे हा विदर्भातला एक 28 वर्षाचा युवक.टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत शिक्षण घेतलेला आणि सामाजिक सेवेचा वसा घेतलेला हाडाचा कार्यकर्ता. वाचनाचे आणि शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्त्व जाणून युवकांच्या आणि मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेच्या विकासासाठी पुस्तकांचा ज्ञानासागर गावोगावी उभारण्याचा निश्चय केलेला राजाभाऊ. एकलव्य या संस्थेच्या माध्यमातून ‘गाव तेथे ग्रंथालय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे गावा-गावांमध्ये ग्रंथालय उभारणीचे काम एकलव्य करत आहे. मुळात एकलव्याची गाव तेथे ग्रंथालय हीच संकल्पना ज्ञानरचनावादाला आणि वैचारिक प्रगल्भतेला पोषक आहे.एकलव्याचा माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना TISS, APU, JNU यासारख्या नामवंत विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन देखील होत आहे आणि याचाच फलश्रुती म्हणून या वर्षी 20 हुन अधिक विद्यार्थ्यांना नामवंत विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे.
डॉ. तुलसीराम नाईक.विजयवाडा येथे राहणारे आणि शिक्षणाने डॉक्टर असलेले 27 वर्षे वयाच उमदं व्यक्तिमत्त्व ‘शेअरिंग हँड्स’ या डॉ. तुळसीराम आणि त्याच्या वर्गमित्रांनी सुरू केलेल्या उपक्रमाद्वारे लैंगिक शिक्षण आणि योगा यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मुलांना प्रशिक्षण आणि जाणीवजागृती करण्याचे काम ते करतात.अशा प्रकारची वेगळ्याच धाटणीची उपक्रमशील काम करणारी माझ्या माहितीतील ती पहिलीच शाळा होय.ज्यासारख्या विषयात बोलण्यासही मन धजावत नाही अशा लैंगिक शिक्षणासारख्या किचकट विषयावर तुलसीराम आणि त्यांचे मित्र काम करत आहेत.लैंगिक शिक्षणाद्वारे समज-गैरसमज निवारणाचे काम आणि चांगले आरोग्याचे शिक्षणातील महत्व या तरुणांनी ओळखले आहे. याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत मागील वर्षी केरळ येथील पूरग्रस्तांसाठी 50 हजार रुपयांची भरीव मदत या मित्रांनी केली आहे.
श्री कांबळे सर हे वर्धा येथील हावरे लेआउट याठिकाणी शिक्षक म्हणून काम करतात.जिद्द,सचोटी, प्रामाणिकपणा , नावीन्यपूर्णता असे एक न अनेक गुणांनी संपन्न असे श्री.कांबळे सर. काही वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षणप्रणाली शाळांमध्ये राबवायला सुरुवात केली आहे ज्यातून विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास साधला जाऊ शकेल.परंतु ज्ञानरचनावाद हा सर्वप्रथम शाळेतील सहयोगी शिक्षकांना समजावून सांगणं त्यांच्यात रुजवण आणि मग त्याच शालेय व्यवस्थापनात उपयोग करण्याची सचोटी आपल्याला ISO असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्यावर समजते. वरे लेआउटची शाळा होय. ज्ञानरचनावाद रुजविणे आणि वृध्दींगत करणे याच बळावर मुलांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.शाळेतील सर्व भिंती या बोलक्या भिंती बनल्या आहेत.शाळेतील बाहेरचा परिसर हिरवागार आहे आणि त्यासोबतच शैक्षणिक साहित्य बनवून त्याद्वारे देखील मुले ज्ञान आत्मसात करत आहेत. मुलांमधील उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी ज्ञान रचनावाद हा एक उत्तम मार्ग आहे शाळेमधील वर्गखोल्यांची शैक्षणिक सजावट असो शालेय परिसराचे सजावट असो अथवा शालेय परिसरामध्ये केलेले उत्तम परसबाग असो यासारख्या गोष्टी ज्ञानरचनावाद यामध्ये भर घालतात.परंतु हे अतिशय स्तुत्य मॉडेल इतर शाळांत राबविण्यास प्रशासन मागे पडले आहे.
वर्ध्यातील ‘नालंदा अकॅडमी’.नालंदा विद्यापीठाईतपत मोठी नसेल परंतु ज्ञानदानाचा महायज्ञ येथेदेखील चालू आहे.अगदी अविरतपणे गेल्या 5-6 वर्षांपासून. आणि याच नालंदा अकादमी ची आधारशीला आहेत श्री.अनुप कुमार सर. अनुप कुमार यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ ,दिल्ली या ठिकाणी शिक्षण घेऊन केवळ समाजातील वंचित घटकांसाठी ,दुर्लक्षित घटकांसाठी ,एससी /एसटी/ ओबीसी या संवर्गातील मुलांसाठी ज्ञानार्जनाचे महान काम हाती घेतले. केवळ 22 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली नालंदा अकॅडमी आज 350 हुन अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा ,विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षा, याविषयी मोफत मार्गदर्शन करतात.आज भारताच्या 15 वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी वर्धा येथे अनुप सरांचे मार्गदर्शन घेत आहेत.आणि यासाठी हा अवलिया कुठलेच शुल्क आकारात नाही.त्यांच्या याच कष्टाचे फलित म्हणून आजच्या दिवसाला १२०हून अधिक विद्यार्थी, 20 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून शिक्षण घेत आहेत.नालंदा अकादमीचा भक्कम पाया असणारे व्यक्तिमत्त्व, ज्यांच्याशिवाय नालंदा अकादमी उभी राहू शकली नसती असे अजून एक व्यक्तिमत्व.श्री.अभियान सर.दुर्दैवाने मागील सहा महिन्यांपूर्वी अभियान सर यांचे आकस्मिक निधन झाले.अमेरिकेत शिक्षण घेऊन तिथे नोकरी,पुन्हा बेंगलोर येथे राष्ट्रीय विज्ञान संस्थेत नोकरी करून समाजासाठी आणि तळागाळातील मुलांसाठी नाविन्यपूर्ण STEM शिक्षणाचा प्रयोग अभियान सरांनी ‘नालंदा लॅब्स’ने सुरू केला.सरांच्या अकाली जाण्याने नालंदा अकादमी चा आधार गेला.परंतु अनेक अभियान घडविण्याचे काम आज नालंदा अकॅडमी आणि नालंदा लॅब करत आहे.
कु.अतुल राऊत, श्री.अशोक सातपुते, श्री. महादेव चुंचे हे वर्धा येथील त्रिकुट. नोकरीनिमित्ताने वर्ध्यात आल्यानंतर या तिघांची ओळख झाली.शिक्षण हे या तिघांचा आवडीचा आणि एकत्र येण्याच कारण.या क्षेत्रामध्ये काहीतरी अमुलाग्र बदल घडून आणावा या विचारांने या तिघात नेहमी विचार व्हायचा आणि काहीतरी सुरू करण्याचं प्रयत्न असायचा. श्री.अशोक सातपुते आणि श्री.महादेव चुंचे हे समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतात तर कु.अतुल राऊत मुख्यमंत्री ग्राम परिवर्तन म्हणून काम करतात.खूप खटाटोप केल्यानंतर या तिघांनी वर्धा येथे ‘इग्नायटेड माईंडस’ हा शैक्षणिक उपक्रम सुरू केला ज्यामध्ये ग्रामीण भागातील मराठी शाळांना शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून देणे,STEM शिक्षण प्रणाली राबविणे,परसबाग निर्मिती करून देणे, मुलांमध्ये अवघड विषयांचे आवड निर्माण करणे अशा गोष्टीनी सुरवात केली.यासाठी त्यांनी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना क्षेत्र कार्याच्या माध्यमातून शाळांसाठी आणि गावांसाठी वरील गोष्टींची निर्मिती करण्यात मदत घेतली. स्टेम शिक्षण प्रणालीला चालना मिळावी आणि STEM शिक्षण प्रणाली काय आहे हे ग्रामीण भागांमध्ये रूजवण्याच महत्वाचे काम हा उपक्रम करत आहे.हा उपक्रम ‘सायन्स पार्क’ सारख्या नवख्या संकल्पना भंगार समजणाऱ्या साहित्यातून निर्माण करून विज्ञान शिक्षणाचे मॉडेल विकसित करत आहेत.
वरती उल्लेख केलेल्या सर्व उपक्रमाची समाज माध्यमांनी जास्त दखल घेतलेली नसेल, परंतु त्या सर्व उपक्रमांनी चालवलेले नाविन्यपूर्ण कार्य नक्कीच दखल घेण्यासारखे आहे. समाजावरती अपेक्षित परिणाम करण्याचे आणि त्यातून अमुलाग्र बदल घडवून आणण्याचं काम वरील उपक्रम आणि ज्यांच्या सुपीक डोक्यातून या संकल्पना आल्यात ते अवलिया करत आहेत.
त्यांच्या जिद्दीला माझा सलाम.आणि त्यांच्या कामाची सर्वसामान्यांनी दखल घेऊन त्यांचे प्रतिरुपे निर्माण व्हावीत याच सदिच्छा!
-अतुल संगीता आत्माराम.
9527544478


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या ...

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे