Skip to main content

स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’

PC:www.wildfilmindia.com
(देशाचे  मा.पंतप्रधान स्वच्छतेवर खूपच आक्रमक असून नेहमीच त्याबाबत कोणत्या न कोणत्या नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात व्यस्त असतात.हा लेख लिहिण्याचं प्रयत्न मा.पंतप्रधान आणि त्यांच्या स्वच्छताविषयक योजना आणि विचारांनी प्रेरित होऊन खऱ्या अर्थाने ‘स्वच्छता दूत’ असणाऱ्या माझ्या साऱ्या भारतातील माता भगिनींना समर्पित.
#’स्वच्छतेतून -वैचारिक स्वच्छतेकडे’#
मी सायंकाळी  गॅलरीमध्ये चहा पीत  उभा होतो आणि माझी नजर गलरीमधून सायंकाळच्या होणाऱ्या हालचाली टिपण्यात व्यस्त होती.समोरील एका घरासमोर एक मुलगी अंगण झाडत होती.आणि समोरच्या नालीवर काही तळीराम चार्जिंग होऊन बसले होते.मी मात्र ते दृश्य पाहून स्वच्छतेच्या विचारात व्यस्त झालो. बसलेल्या तळीराम फालतू गोष्टी करण्यासोबतच त्या मुलीकडे पाहून एकमेकांना खुणावत होते.ती मुलगी हाताने झाडू घेऊन झाडत होती आणि दुसऱ्या हाताने आपली इज्जत वर तळीरामच्या नजरेतून वाचवण्यासाठी संघर्ष करत होती.बाजूच्याच दुकानात टीव्हीवर नुकताच मा.देशाच्या पंतप्रधान कडून झालेल्या ‘मन की बात’ वर चर्चा चालू होती.मा.पंतप्रधान महोदय मोठ्या अभिमानाने स्वच्छतेविषयी ‘मन की बात’ मध्ये सांगत होते.झाडू ची महती आणि त्याचे अस्तित्व यांचा योग्य ताळमेळ लावायचं काम चालू  होतं मन की बात मध्ये.मात्र त्या क्षणी समोरील दृश्य पाहून माझ्या मनात विचारांचं इंजिन सुरू झालं आणि समोर घडणाऱ्या गोष्टी त्यामध्ये पेट्रोल टाकत गेल्या. डोळ्यासमोर जे दिसत होता आणि कानावर जे ऐकायला येत होतं याच ताळमेळ आणि घटनांची जुळवाजुळव  करण्यात माझ्या मनाची धावपळ चालू होती. समोर मुलगी झाडून अंगण स्वच्छ करत होती.दारू पिऊन तररर झालेले तळीराम खर्रा खाऊन त्याच दुकानापुढील अंगणात लाल रंगाच्या पिचकाऱ्या मारत होते म्हणजे सकाळी पुन्हा दुकानाची मालकीण ला अंगणात स्वतःचाच दुकानातून विकलेल्या खर्र्याने रंगलेले अंगण झाडण्याची वेळ येणार होती.संत गाडगेबाबा यांना आठवून त्यांच्या हातातील झाडू आणि खपराच्या मटक्याचे आठवण झाली आणि तीच खपराची मटके त्या तळीरामांच्या गळ्यात बांधावे आणि तेच झाडू घेऊन त्यांनी स्वतःच अंगण झाडाव म्हणजे स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदार असणाऱ्या माझ्या भगिनींना स्वतःची इज्जत अशा दळभदर्या लोकांपासून वाचवण्याची कसरत करावी लागणार नाही याची जाणीव झाली.स्वच्छतेच्या खऱ्या शिलेदार असणाऱ्या  माझ्या माता भगिनी ज्यांना आपण घरातला कचरा पण साफ करायच आणि वासनांध लोकांचे मनातल्या घाणीपासूनदेखील स्वतःच राखण करायची हे पाहून घरातील महिलाच खरी ‘स्वच्छतेची दूत ‘असल्याची जाणीव झाली.आतापर्यंत माझा चहा पिऊन झाला होता आणि मी नालीच्या बाजूलाच पडलेल्या एका फाटक्या कपड्याच्या तुकड्यावर शून्यतेने नजर लावून बसलेले होतो.न राहवून कपातील शेवटचं घोट असलेलं चहा तसाच बेसिनमध्ये ओतला आणि नकळतपणे अस्वच्छता करणाऱ्यांमध्ये मी सुद्धा गणले गेल्याचं मला समजलं देखील नाही.खाली जाताना पहिले ते फाटके कपड्याचा तुकडा उचलताच ‘काय हो साहेब ‘?म्हणून तळीरामांनी आवाज दिला.जाताना अश्लीलतेने भरलेल्या त्यांच्या नजरा पाहून आणि त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल कोणत्याही प्रकारचा एक शब्दही न बोलता नकळतपणे मी त्यांना प्रोत्साहन देऊन मानसिक अस्वच्छता वाढविली.थोडा समोर जातोय तेव्हा अस लक्षात आलं की काही मुलं तिथे ‘पारंपरिक खेळ’-गोट्या खेळत होती.साहजिकच लहान मुलांना मस्ती करण्यासोबत त्यांच्यासोबत खेळण्याचा आनंद घेतो न घेतो तोवर बाजूलाच बसलेल्या युवकांच्या टोळक्याकडून अश्लीलतेला प्रोत्साहन देणार संभाषण त्या मुलांसमोर झालं आणि साहजिकच केवळ पारंपरिक खेळातून लहानग्या मुलांच्या मनावर नकळत ‘कु-संस्कार’ झाले.साधारण 2 तासाच्या अवधीमध्ये घडणारे हे प्रसंग मा.पंतप्रधान साहेब.भौतिक स्वच्छतेला महत्व देणं उचित आहेच.परंतु आमच्या मनातील जी अस्वछता आहे ती सुद्धा स्वच्छ करण्यासाठी काहीतरी करावं लागेल.माझ्यासारखा युवकासाठी  अथवा एका सामान्य नागरिकांसाठी या गोष्टी साधारण आहेत.आजपर्यंत मीदेखील कधी या गोष्टीचा आशा बाजूने विचार केला नाही.परंतु आपल्या मनातील वैचारिक अस्वच्छता दूर झाल्याशिवाय चिरंतन आणि आरोग्यदायी स्वच्छता होणे अवघड गोष्ट आहे.आज मी तर बदललो आहे.परंतु माझ्या डोळ्यासमोर घडणाऱ्या असणाऱ्या मानसिक अस्वच्छतेला स्वच्छ करण हे आव्हान आहे!गावामध्ये तर स्वच्छता अभियान राबतच आहे.परंतु लोकांच्या मनातील घाण दूर करण्यासाठीसुद्धा एखादे 
अभियान राबवण्याचा विचारात  मी मात्र रमून गेलो.
Advertisements
Occasionally, some of your visitors may

Comments

  1. छान।सहजपणे दिसून न दिसल्याचे सोंग घेणारी लोकांची मानसिकत्यात बदल होणे गरजेचे आहे।स्व पासून चांगल्या कामाची सुरुवात करतांना सुरुवात करणाऱ्याला चं मागे खेचण्यात जास्त आनंद वाटतो लोकांना।मग हे स्वच्छता संदर्भात असो किंवा आणखी कोणतेही चांगला विषय।एकत्र येऊन सर्वांनी च आपल्या घराची ,परिसराची स्वछतेचे काम हाती घेतला तर गल्ली च नाही तर संपूर्ण देश स्वच्छ होईल।

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या ...

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे