Skip to main content

Posts

Showing posts from 2020

Redefining Education

 Field Diary:1 There are many true COVID-19 Worriers.Nilesh,You are the inspiration for all.Your tremendous efforts for continuing education will bring change in education very soon. #Education_Shouldnt_stop! Atul Sangita Atmaram-9527544478

घनकचरा व्यवस्थापनाचा सुप्त किडा

 टाटा इन्स्टिट्यूट मधून पाणी,स्वछता आणि आरोग्य व्यवस्थापन विषयात पदवी घेऊन  मी युनिसेफ संस्थेसाठी काम करत आहे.जेव्हापासून मी WASH कोर्सला प्रवेश घेतलंय, तेव्हापासून जिथं कुठं  मला घनकचरा दिसतोय-तेव्हा माझ्यातील सुप्त किडा मला नेहमीच आव्हान करत होता. "अरे अतुल,एवढा तुझ्यासमोर कचरा दिसतोय आणि तू काहीच करत नाहीयेस ?" असं बोलल्याप्रमाणे तो मला जणू शह देत होता. माझ्यासह अखिल मानवजात त्यांच्या दैनंदिन जीवनात कोट्यवधी किलोचा कचरा निर्माण करून पृथ्वीवर साठवत आहे.आणि फार कमी लोक त्याच्या व्यवस्थापणासाठी काम करत आहेत.  मी यवतमाळ येथील उमरी गावातील एका संस्थेत मागच्या एक आठवड्यापासून मुक्कामी आहे.येण्याचं प्रयोजन म्हणजे घनकचरा व्यवस्थापन. अभियांत्रिकी आणि सामाजिक विज्ञान शास्त्रातील माझ्या पदवीचा उपयोग या ठिकाणी पुरेपूर करून शिक्षण,पोषण आणि पर्यावरण विषयात दखलपात्र काम करता येऊ शकतं का ? याचाच मला अनुभव घ्यायचं आहे. इथे खचाखच भरून असणारा कचरा मला जास्तच अनुभव देत आहे.अगदी निर्जीव गोष्टीदेखील तुम्हाला शिकवत असतात त्याप्रमाणे!  येणाऱ्या काही दिवसांत यावर काय काय फलनिष्पत्ती देणार याचा रोख

विदर्भाच्या रानभाज्या

 विदर्भाच्या रानभाज्या - १. टाकळा टाकळा (तरोटा) शास्त्रीय नाव - Cassia tora (कॅसिया टोरा)  कूळ - Caesalpinaceae (सिसालपिनेसी)  टाकळा ही वर्षायू वनस्पती ‘‘सिसाल-पिनेसी’’ म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. या वनस्पतीला काही भागांत ‘तरोटा’ किंवा ‘तरवटा’ अशी स्थानिक नावे आहेत. टाकळा हे तण पडीक ओसाड जमिनीवर, शेतीत, बागांमध्ये, जंगलात, रस्त्यांच्या कडेने सर्वत्र वाढलेले असते. टाकळ्याच्या बिया भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो. टाकळ्याची भाजी: टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर आहे व मलसारक आहे.  पाककृती - कृती १  - फुले येण्यापूर्वीची कोवळी पाने भाजीसाठी वापरावीत.  साहित्य - कोवळी पाने, कांदा, ओली मिरची, तेल, आले, मीठ, ओले खोबरे, हळद

'मी सक्षम'

रसिका! Ignited Minds चा पडद्यामागील व्यक्तिमत्व! अगदी सुरुवातीच्या काळापासून बोलण्यातून कमी आणि शब्दातून जास्त व्यक्त होणारी व्यक्ती! तिची 'स्व' ला घेऊन महि ला सशक्तीकरणाची कविता. बोलायचय मला मनमोकळ हसायचे मला खळखळून अगदी निर्मळ वाहणाऱ्या झऱ्यासारख वहायचे मला भरभरुन तोडायचीत सर्व बंधने जगायचं मला निर्भयाने उडायच मला मनसोक्त त्या उंचावरच्या गरुडा प्रमाणे उन्हातल्या  सावलीत विसावयचं मनाचा डोहात पोहयचं या नभाचा गाभाऱ्यात बिंधास्त रान पाखाराप्रमान भिरभिरायचं गाण्यातील सुराप्रमाने नाचायचं कवितेचा शब्दात रुजायचं या असाह्य जगात वावरताना मला फक्त स्वतःच बनायचं                         - रसिका ननवरे

मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण

#मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षण: शिक्षणाबाबतची माहिती मिळवून तिचे पालन करणे महत्वाचे का आहे? मुलांच्या वयाची पहिली 8 वर्षे अतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली 3 वर्षे. भावी काळातील आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो. ह्या कालावधीमध्ये मुलांचा शिकण्याचा वेग सर्वाधिक असतो. किशोर आणि लहान मुलांना प्रेम, वात्सल्य, प्रोत्साहन व मानसिक पातळीवरील चालना तसेच आरोग्य  संगोपन व पोषक आहार मिळाल्यास ती उत्साहाने शिकतात.  जन्माची कायदेशीररीत्या नोंदणी होणे, आरोग्य संगोपन, पोषक आहार, शिक्षण, छळ आणि भेदभावापासून संरक्षण मिळणे हे सर्व मुलांचे अधिकार आहेत. ह्या अधिकारांचे आदरपूर्वक पालन, संरक्षण केले जात आहे हे पाहणे पालक आणि शासनाचे कर्तव्य आहे. मुलांचा विकास आणि आरंभिक शिक्षणाबाबत प्रत्येक कुटुंबास व संप्रदायास कोणती माहिती मिळण्याचा हक्क आहे. वयाच्या पहिल्या 8 वर्षांमध्ये घेण्याेत आलेली काळजी व संगोपन, विशेषत: पहिल्या 3 वर्षांतील, अत्यंत महत्वाचे असते आणि त्याच्या किंवा तिच्या  आयुष्यावर ह्याचा प्रभाव पडतो. मुले जन्म घेतल्या क्षणीच शिकू लागतात. त्यांना योग्या आरोग्

शून्य गुंतवणुकीतून पोंभुरण्यातील महिला बचत गटाने उभारला मास्क निर्मितीचा व्यवसाय.

 सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजकांनी नेहमीच समाजासाठी प्रेरणादायी विचार आणि आचार ठेवला आहे. कोरोनामुळे लॉक डाऊन च्या काळात आपली सगळी अर्थव्यवस्था ठप्प झाली असताना आरोग्य व्यवस्थेशी संबंधित मास्क बनविण्याच्या महिला बचत गटाच्या पोंभूर्ना येथील सदस्यांचा  व्यवसाय नक्कीच प्रेरणादायी ठरेल. #आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर शून्य गुंतवणुकीतून  पोंभूर्ण्यातील महिलांनी सुरू केला मास्क बनवण्याचा व्यवसाय. कोरोनामुळे संपूर्ण भारतामध्ये हाहाकार माजला आहे.परिणामी भारतामधील सर्व उद्योगधंदे, गावातील छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सगळे ठप्प पडले आहेत.भारताचे शेतीमाल प्रक्रिया आणि दैनंदिन वस्तू व्यतिरिक्त कुठलेही उत्पादन सुरू नाही. गेल्या चार  आठवड्यापासून संपूर्ण भारतामध्ये लॉक डाऊन चालू आहे आणि महाराष्ट्रमध्ये 3 मे पर्यंत लॉक डाऊन चालू राहणार आहे. महाराष्ट्र हा विकसित भाग म्हणून भारतामध्ये आणि जगामध्ये ओळखला जातो. परंतु कोरोना या साथीच्या रोगामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. संपूर्ण वित्तीय बोजा हा आरोग्य यंत्रणेशी संलग्न सेवा पुरवणा-या  यंत्रणावरती खर्च होत आहे. जा

Understanding Nutrition

#Understanding Nutrition :t Chapter:2  Understanding Nutrition in day today used vegetables. I tried to compiled verious ingredients gain by body on  its consumption.To gather this information various resources are used. I hope this information helps you to understanding it's importance.
Chapter 1: Understanding Nutrition #Nutrition is an integral component of every individuals life. Even lifestyle decides nutritional development in individuals life.We team of Ignited minds starts to exploring  rural India and will brings you various things in society about nutrition. Stay tuned for next chapter.
'  Real Waste Managers ' Few days before I got opportunity to visit  Municipal Solid Waste management unit at Pune .During that visit whatever I observed and experienced that was very pathatic.We so called  'literate ,Modern' Urban community are the major polluter. Because of having  plenty money  and mainting our lavish lifestyle we creates so much hazardous waste unknowingly. And we want to manage that waste by others which was created by us. Who are those 'others'. Those are real  waste managers in society.We are  little bit environmently safe bacause of them only. We so called 'literate community' feel shamed to pronounce words  about waste such as condoms, sanitary napkins ,Diapers in public. Are we ever go through the user and disposal instruction written on it? Yes or No. Irrespective of that  we simply dumped it into dustbins , open spaces,drainage lines.Our this  hazardous,filthy waste will be pick up by any woman, man
' घनकचरा व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण शिक्षण संसाधने आणि विकास ' तुम्हाला जर मी एक प्रश्न  विचारला की ,जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेबद्दलची तुमची कल्पना काय तर तुम्ही काय उत्तर देणार? माझा मित्र अनिकेत आणि त्याच्यासारखे कित्येक जण असं म्हणतात की, मराठी शाळा चांगल्या आहेत, वातावरण चांगलं आहे,जागा भरपूर आहे पण शाळेसाठी इन्फ्रास्ट्रक्चर नाहीय.शाळेकडे कोणी लक्ष देणार नाहीय.संसाधनांची उपलब्धता आणि वापर याचा अभाव आहे.माझ्या पुन्हा प्रश्न आहे की, सगळीकडेच हेच पाहायला मिळत आहे का? आणि बहुतांशी  मला मिळालेली उत्तरे हीदेखील नकारार्थीच आहेत. आज ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शालाबद्दल खूप अप्रूप आहे.इंग्रजी शाळेत माझं पोरग गेलं म्हणजे सगळी शिक्षणाची उच्च सुविधा आपल्या पोराला उपलब्ध होणार असा त्यांचा भ्रम! माझ्या पोराला एवढी 'जास्त फी -तेवढी हजार फी ' यावरच शिक्षणाची तुलना होऊ लागली आहे.पण त्या शाळांतील शिक्षणातून दर्जात्मक,गुणात्मक शिक्षण दिलं जात आहे का,आपला मुलगा भविष्यात  जागतिक स्पर्धेला  दोन हात करण्यासाठी समर्थ होईल का हे नाही समजत! शिक्
' उपेक्षेच्या धनी झालेल्या - आदिवासी महिला संशोधक' या फोटोतल्या बाया तशा दिसायला साध्यासुध्या आहेत. मान्हेरे, आंबेवंगण, पिंपळदरावाडी, कोंभाळणे, एकदरे, खिरविरे या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागातल्या आदिवासी पाड्यांवर त्या वस्तीला असतात. त्यांच्या कार्यकर्तृत्त्वामुळं त्या अलीकडे उजेडात येताय. साध्यासुध्या दिसणाऱ्या या बायांचं असामान्य कर्तृत्व कोणते? ते समजून घ्यायला हवे. *1)हिराबाई लहू गभाले* या ग्रामीण बँकर आहेत. मान्हेरे येथे त्या राहतात. बचत गटाच्या माध्यमातून शेकडो महिलांना स्वयंरोजगारासाठी भांडवल देत त्यांना पायावर उभे केलेय. कितीतरी कुटुंबांचे स्थलांतर तिने रोखले आहे. *2)ममताबाई देवराम भांगरे* :-ज्यांच्या सेंद्रीय शेतीतील प्रयोगांनी देशाचे लक्ष वेधलेय त्या देवगावच्या ममताबाई देवराम भांगरे देशाच्या शेती धोरणात ममताबाई यांची केसस्टडी प्रसिद्ध झालीय, यावरुन त्यांच्या भात पिकातील संशोधनाचा अंदाज यावा! आयआयटी, आयआयएममधले प्रोफेसर, विद्यार्थी, धोरणकर्ते इथे येऊन, ममताबाईंकडून व्यवस्थापन आणि संशोधन याचे धडे घेताय! त्यांचं काम समजून घेत अभ्यास करताय