Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019
भाग-2  ' सामाजिक उद्योजकता लोककला आणि कलापथक' समाजामध्ये सामाजिक जाणीवजागृती निर्माण करण्यासाठी कलापथक यांचे अमूल्य योगदान राहिलेले आहे.ते पारंपरिक कला सादर करतात ज्यातून मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन होते. आजच्या घडीला सोशल मीडियाच्या वापराने त्याच्या एवढा प्रभाव कोणत्याच माध्यमाचा नाही. बुरसटलेली विचारसरणी, परंपरागत रुढी यांचा  प्रभाव, नवीन विज्ञानवादी गोष्टींचा विचार करण्याची अपरिहार्यता या सर्व गोष्टी पारंपारिक कला पथक प्रभावी पद्धतीने  सादर करण्याचे काम करत आहे. आज भारतात  संडासांची संख्यापेक्षा मोबाईलची  संख्या जास्त आहे.म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेपेक्षा तांत्रिक गोष्टींचा वापराला जास्त महत्त्व आहे.म्हणूनच या मोबाईलच्या माध्यमातून इतर पश्चिमात्य गोष्टींचा अगदी सहजतेने प्रवेश होत आहे ज्याच्यामुळे आमचा मेंदुसुद्धा  काम करणं बंद झाला आहे. दिसली मोकळी जागा की मुतणार तिथे, थुंकनार तिथे,कचरा पण टाकणार तिथे...मग राहत ते काय? आणि याच गोष्टीमुळे आज  हागण्या-मुतण्यावर ,कचरा ,आणि स्वच्छतेवर या लोकांना प्रबोधन करण्याची वेळ येत आहे. नविन मूल्यांची उपयोगिता,सृजनशीलता , विज्ञानवादी
 शोध  सामाजिक उद्योजकतेचा.". माझ्या वैयक्तिक भेटीतून आणि क्षेत्र अनुभवातून मी पाहिलेल्या 15  असामान्य सामाजिक उद्योजक आणि त्याच्या उद्योगांची शृंखला लिहण्यासाठी सुरुवात करत आहे.हे सर्व उद्योजक आपल्या प्रत्येकाच्याच पाहण्याचे आहेत.परंतु त्यांच्याप्रती असलेला सामाजिक दृष्टिकोन बदलून त्यांच्याकडे एक माणूस आणि उद्योजक म्हणून पाहून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे अथवा त्यासाठी प्रयत्न करणे हाच या शृंखलेचा उद्देश! भाग -1: ' मी मूर्तिकार 'असामान्य सामाजिक उद्योजक ' मी अशा व्यक्तीविषयी बोलत आहे जे आपल्या समाजात  'सामाजिक उद्योजक' म्हणून काम करतात आणि त्यांचं काम आहे कचरा व्यवस्थापनाच. तुम्ही आम्ही लोक  दारू पिऊन  ज्या बाटल्या टाकतो  ना त्याची टोपण कुजली जात नाहीत. त्याच टोपणांवर प्रक्रिया करून त्यापासून अप्रतिम आणि सुबक मूर्ती बनविण्याचे काम हा अवलिया करतो. आणि आपल्यासारखे लोक आपल्याच कचऱ्याची त्याच्याकडे असलेल्या जुगाड  टेक्नॉलॉजी  द्वारे सुबक मूर्ती बनवून घेतात. बुरसटलेले सामाजिक विचारसरणी,कचऱ्याच्या किमतीपेक्षा समाजामध्ये मिळणारी कमी  किंमत हेच ते काय अशा सामाज
"पुन्हा एकदा मासिक पाळीवर बोलू काही-सुसंवाद दोघांशी" समाजामध्ये आज कचऱ्याची  जी व्याख्या आहे तीच व्याख्या 'मासिक पाळी व्यवस्थापन ' विषयी आहे. कचऱ्याला कचरा म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास सुरुवात झाली तसेच मासिक पाळी या विषयवार बोलणं सुरुवात झालं हेच महत्वाचं.येणाऱ्या काळात महिलांच्या आरोग्याविषयी आणि पर्यायाने सामाजिक आरोग्याविषयी यामध्ये मानसिक ,शारीरिक आरोग्य आलेच हा! समाजामध्ये या बाबतीत सकारात्मक बदल घडूनच येत राहावं हीच अपेक्षा. साधारण दीड वर्षापूर्वी विदर्भात एका गावात मी समाजकार्य महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या साहाय्याने एक सर्वेक्षण केलं होत, ज्यात अस आढळून  आला होत की गावामधील ८०% महिला जे मासिक पाळीदरम्यान कापडाच वापर करतात ते धुवून सावलीत  आणि अंधाऱ्या जागी वाळण्याला घालतात जे की पूर्णपणे आरोग्यास अपायकारक आहे.तसेच या बाबतीत म्हणावी तशी जागरूकता नाही आहे. दुसरा सर्वेक्षण मी मागील महिन्यात केलं ते हे की मुलींमध्ये  सनिटरी नॅपकिन वापरण्याविषयी जाणीव जागृती आहे परंतु त्याच सुरक्षित विल्हेवाट व व्यवस्थापन करणे  याबाबत जाणीव जागरूकता म्हणावी तशी नाही
 ' A Grandmother and her unique enterprises spreads smile among kids in Village'                                     At my previous blog, I said that peoples in villages are enough capable to think and out a way for their bread and butter. In today's era we called them 'social entrepreneur's. Because of only lack of marketing strategies and linkages along with willpower to expand it,it became limited to for villages.                                    In today's article a 75 years old grandmother from Apsinga village is social  entrepreneur. When I visited to her and discussed about  innovative work,During our discussion in between she laughs so much and that seems her satisfaction through that livelihood option. Anyone imagine how does she 300 rupees in only 2 hours per the day. Amazingly she has nothing to do without sitting on a chair at single place in front of her home. That's why I said that  peoples in villages can easily find ou
'सामान्यांतील  असामान्य सामाजिक उद्योजक ' ' Uncommon Social Entrepreneur_'  ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे उद्योजकता असू शकते याविषयीचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. ज्याला आपण आजच्या युगामध्ये 'जुगाड तंत्रज्ञान' संबोधतो त्याचा उदय हा ग्रामीण भागात होत असतो.लोकांच्या सुप्त डोक्यातून कल्पना या अशाच उगम पावत आहेत गावागावातून. वास्तविक पाहता ग्रामीण भागातील ही कला जर जतन केली  व त्याला चांगल्या पद्धतीने तज्ञांचे मार्गदर्शन घेतलं आणि विपणन साखळी उपलब्ध करून दिली तर आजच्या काळात करोडोंचा व्यवसाय करणारे व्यवसायांच्या यादीत ही जुगाड तंत्रज्ञाने बसतील. चला तर पाहुयात असच एक जुगाड तंत्रज्ञान. सामाजिक उद्योजक म्हणून हा अवलिया नक्कीच सार्थ ठरतोय .आजच्या काळातील ह्या सामाजिक उद्योजक, उद्योजकता, तंत्रज्ञ, तंत्रज्ञान यासारख्या अवघड वाटणाऱ्या संकल्पना ज्या  आहेत तो हा अवलिया प्रत्येक दिवशी जगतो. पण त्याला माहीतच नाही की आजच्या बदलणाऱ्या  आणि स्पर्धेच्या युगात याला सामाजिक उद्योजकता आणि स्वतःला सामाजिक उद्योजक म्हणतात. तसं पाहिलं तर हा जो व्यवसाय आहे तो त्यांचा पि
Field Diary': कथा परिवर्तनाची: 'आदर्शगाव राजगड' चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुल तालुक्यापासून  २५ किमी अंतरावर असलेलं राजगड हे गाव.गावाला प्राचीन काळापासूनच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.राजगड म्हणजे गेडाम राजाची भूमी.आजही त्या राजवटीच्या अस्तित्वाच्या खुणा पाहायला मिळतात.चंद्रपूर चे आत्राम राजे आणि  राजगड चे गेडाम राजे हे दोन राजघराणे. चंद्रपूर च राजा शक्तीने बलशाली असल्याने त्याने काही काळातच राजगडच्या गेडाम राजाचा पराभव केला. गावामध्ये  मामा तलावात असणारे हेमाडपंथी मंदिर गावाच्या ऐतिहासिक वैभवात अजुनच शोभा आणते. सौ.हजारे या इथल्या सध्याच्या सरपंच.गावाच्या इतिहासात एकदा अपवाद वगळता २००० सालापासून  बिनविरोध निवडणूक होत आहे.२००२ २००३  मध्ये गावाला  स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्याच निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला.त्यानंतर पुन्हा २०१६मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला.ग्रामपंचायत मध्ये ग्रामसांसद हॉल मध्ये  आतापर्यंत मिळालेलं सगळे पुरस्कार ठेवून आहेत.ते गावाच्या अभिमान वाढवतातच.आता आपण बोलुयात स्वच्छतेविषयी.गावामध्ये मुख्य रस्त्यापासून ग्रामपंचायत पर्यंत पोचण्यासाठी साधारण १.५ ते २ किमीच्
Curiosity Matters# Good_Education 4_Better_India #Learn2Lead #Ignited  Minds Providing accessible and affordable educational tools to students in rural India can be lead to betterment in rural educational system.These will helpful to gaining of students interest in difficult subjects too.!
पोटाची भूक भागवायला निघालेलं हे दुकान,आणि जिभेसाठीच माझा हट्ट,आणि त्यासाठीची प्रतीक्षा।पिढ्यानपिढ्या चालेलला हा भावनेचा भार।आजोबा आणि,नातू,जीवन पट दर्शवते आज। सामोरंच अदृष्य दृश्य पण नवीन पिढीला  देताय जून्या कलेचे शिक्षण।निरीक्षणाचा खेळ हा...घेत आहे धडे,समोर येणाऱ्या प्रश्नाचे।अवगत होत आहेंत नवीन कला,त्या पिढ्यानपिढ्या येणाऱ्या घटकास।बदलेल ही पिढी पण हट्ट मात्र असनार त्या जिभेच्या  चविचा।
आयुष्याची सुरवात  करू बघताना प्रत्येक वळण नवी दिशा देत गेलय। ती दिशा म्हणजेच रोजच उगवणारा प्रत्येक दिवसच।त्या दिवसातील प्रत्येक प्रसंगमधील सोबत जणू नवीन आत्मविश्वास निर्माण करतो। प्रत्येक क्षणाला  सोबत असते त्या निसर्गाच्या सनिध्याची ।प्रवासात वाटेवर वाटसरू आपला बोझा घेऊन जात,दूर देशी नवीन दिवसाकडे। अशाप्रकारे जीवन आणि वाट याच समीकरण जुळवता जुळवता,आयुष्य चे रंग ,वेगवेगळ्या छटा प्रत्येक दिवसाला अगदी नाविन्यपूर्णतेने बघायला मिळतात!
बहीण म्हणाली मला,चल न दादा फिरायला, किती दिवस झालं ,बाहेर जायला. म्हणाली मग ती मला काय रे दादा,तुझी पाखरू कसली भारी हसली आज? करून येईल  का कधी ती तुझ्यासाठी साज? तुला ती दिसली आणि  पाहून हसली , तेव्हापन तुझ्या चेहऱ्यावरची चमक मला दिसली. अरे दादा,नको करू लेट, तू थेट जाऊनच भेट,  तिने सांगितलंय मला तिच्या मनाचा 1 कप्पा, राखून ठेवलाय तुझ्याशी मारायला गप्पा! बहीण म्हणाली मला, ये दादा,  उद्या जाणार ती गावी,मग तुला बोलण्यासाठी नको का कोणी, CC ला तू जाशील आणि जाम बोर होशील, आणि पुन्हा मलाच तुझ्या विरहाच्या कविता ऐकवशील! मी सांगते त्यापेक्षा ऐक ना दादा, तिला सांगून टाक ना तुझ्या मनाचा वादा.. माझ्यापुढे डोंगराएवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, आणि ती आली की चॉकोलेट सारखा वितळतोस.. सांगून ठेवते तुला, म्हणायचा नाही परत मला, तिची आठवण येतेय म्हणून!  म्हणाली मग मला दादा तुला सांगू का?    तू म्हणजे चहा न ती म्हणजे कॉफी, तू म्हणजे ऊन, ती म्हणजे सावली,  तू म्हणजे दिवस ,ती म्हणजे रात्र, तुमच्या दोघांचं अस्तित्व आहे हे सत्य, तुम्हाला न बोलायला पाह